पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग़्रंथसंग्रहालय, वाई


६१
पित्तविकारांपैकी ज्वर.



जागीं अन्नाला माधुर्य येऊन कफ वाढतो असा उल्लेख आहे. त्यावरून (आदौ षड्रसमप्यन्नं मधुरीभूतमीरयेत् फेनीभूतं कफं ) नाभिरामाशयः इत्यादि पित्तस्थानांतील आमाशय म्हणजे पच्यमानाशय होय. कफामुळेच अन्नाचें आर्द्रीभवन होऊन पचन होतें. तरी आमाशयापासून वांती होते. मग वांती ज्या स्थानांतून होते अशा कफाचे स्थानरूपि आमाशयापासून होणारा विकार पित्ताचा कसा ? त्याचा तर स्पष्टपणे अम्लपित्त असा उल्लेख असून पित्तविकारामध्ये त्याची गणना आहे. मग अम्लपित्त ह्मणजे काय ? अम्लपित्त या नांवावरूनच अम्ल असें पित्त असा उघड अर्थ होत आहे. आमाशयाचें अविकृत कार्य ह्मणजे त्यांत आलेल्या चतुर्विध आणि षड्रस अशा विधियुक्त आहाराला पातळपणा, माधुर्य, आणि फेसाळपणा उत्पन्न करून खालीं पच्यमानाशयांत जाण्याला लायक बनविणें हें आहे. ज्या वेळीं स्वभावतः विदाहि अशा तीक्ष्णोष्णाम्ल इत्यादि पदाथींचा आहारांत अधिक उपयोग होतो त्यावेळी असल्या आहारामुळे आमाशयांतील हें कार्य नीट न होता तेथें आंबटपणा उत्पन्न होतो, आणि पुष्कळ संवयीने आमाशयाला अशी खोड लागते कीं, तेथे गेलेला कोणताहि पदार्थ अम्ल व्हावा अशा रीतीनें अनैसर्गिक क्रिया चालू झाली ह्मणजे असलें आंबलेले व अम्लविशिष्ट अशा तीक्ष्णोष्ण गुणांचे अन्न सहन करण्याची स्वभावतः मृदु अंतर्भागाचे आमाशयाला शक्ति नसते, व त्यामुळे अन्नाचा या गुणानें क्षोभ होऊन विकृत अन्न मुखावाटे बाहेर फेकलें जातें, हीच वांती आणि असली विकृति म्हणजे अम्लपित्त होय. असल्या अन्नांत अम्ल तीक्ष्ण असे गुण येतात व ते पित्ताचे असतात. पण कारण पित्ताची उष्णता नसून अपक्वपणा असतो. म्हणूनच याला अम्लपित्त नांव आहे. म्हणजे पित्ताची वाढ ही विकारोत्पादक दृष्टि नसून पित्ताचा अस्वाभाविक कोप ही असते. या विकारावर उपायहि असे असतात कीं जे ही आंबण्याची क्रिया आपल्या प्रभावाने थांबवून पचनाला मदत करतील, अर्थात् उष्ण असे असतात. जर उष्णत्वाने हा विकार पित्तापासून होईल तर उपाय उष्ण न करितां पित्ताचें उष्णत्व विरोधी शीत करावे लागतील, तसे न करतां उष्ण व अम्लविरुद्ध असे उपचार करावे लागतात. अम्लपित्त या विकारावर सूतशेखर हैं आयुर्वेदीय औषध प्रसिद्ध आहे. यामध्ये पारा, गंधक, ताम्र, बचनाग, त्रिकटु इत्यादि पदार्थ शीत नाहींत तर ते उष्णवीर्य आहेत. यांमध्यें पचनशक्ति वाढविण्याचे सामर्थ्य असून शिवाय ते प्रभावानें अम्लत्व विरोधी ह्मणजे आंबण्याच्या क्रियेला घालविणारे आहेत हाणूनच अम्लपित्तावर गुणकारी होतात. सूतशेखर हें औषध पित्तावर आहे याचा अर्थ तें