पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
आयुर्वेदातील मूलतत्वे.


अन्नरस हा अशाप्रकारें एक महिन्यानें शुक्र धातूचे अवस्थेला पोहोचतो. आणि पोषक पदार्थांचे इतिवृत्त म्हणजे शुक्रावस्था प्राप्त होणें हेंच आहे ही शुक्रावस्था यावयाची म्हणजे अन्नरसावर रंजक पित्ताचा संस्कार होऊन तो सर्व धातूंमध्यें फेंकला जातो. व त्या धातूंमध्ये त्याचे धात्वाश्रयी पित्ताने अथवा पाचकशक्तीनें पचन होऊन उत्तरोत्तर धातूंची उत्पत्ति होते. व यासाठी त्या जागी धातूंमध्ये म्हणजे सर्व शरिरांत पित्ताची अवश्यकता असतेच. शरिरांतील पचनक्रियेचे वर्णन करतांना जो धात्वाग्नि म्हणून सांगितला आहे, तो याच उद्देशानें होय.

अन्न भौतकधात्वाग्निकर्मेति परिभाषितम् ॥ अ.हृ. ॥
सारस्तु सप्तभिर्भूयो यथास्वं पच्यतेऽग्निभिः ॥ अ.हृ. ॥
स्वस्थानस्थस्य कायाग्नेंर्षा धातुषु संश्रिताः ।
तेषां सादातिदीप्तिभ्यां धातुवृद्धिक्षयोद्भवः ॥ भ. ह. ॥


 धात्वंतर्गत अशी जी ही पचनशक्ति तीच आयुर्वेदीयांचें सर्व शरीरव्यापी असें पित्त होय. पोषक पदार्थ त्या त्या धातूमध्ये गेल्यावर त्यांचे पचन होऊन प्रत्येक ठिकाणीं सारभाग व मलभाग व त्याबरोबर त्या त्या धातूचें वास्तविक स्वरूप असे तीन प्रकार होतात. व अशा रितीनें प्रत्येक धातु हा ह्या तीन अवस्थांमध्ये असतो असा उल्लेख आहे.

स्थूलसूक्ष्ममलैः सर्वे भिद्यंते धातवस्त्रिधा ॥
स्वःस्थूलोशः परं सूक्ष्मस्तन्मलं याति तन्मलः ॥ अल्लाचार्य ॥

  प्रत्येक धातूचे स्वरूप स्थूल, त्यापुढील धातु सूक्ष्म व या पचनक्रियेमध्ये निघणारा मळ, त्याचा मळ याप्रमाणें हें पचनाचें कार्य अविरत चालू असतें. कोणत्या धातूचा मळ कोणत्या याची यादी अशी आहे :

कफः पित्तं मलः स्वेषु प्रस्वेदो नखरोमच ।
स्नेहोऽक्षित्वाग्वेशामोजो धातूनां क्रमशो मलाः ॥ अ.हृ. ॥

 १ कफ, २ पित्त, ३ कान, नाक, इत्यादि स्रोतसांतील मळ, ४ घाम, ५ नखे आणि केंस, ६ त्वचा, नेत्र वगैरे. वरील ६ स्निग्धता आणि ७ ओज, हे क्रमाने, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि मज्जा आणि शुक्र या धातूंचे सात मळ होत. (मलाविषयी खुलासा मागें कफाचे प्रकरणांत केला आहे. ) या धातु परंपरेचें निवर्तक पित्त असून अशा प्रकारें धातुपरंपरा अखंड चालू राहिल्याशिवाय जीवित आणि शरिराचे नित्य व्यापार यांचे अस्तित्व राहणार नाहीं. व ही परंपरा ज्या पचनात्मक पित्तामुळे अप्रतिहतपणे राहते तें पित्त, त्रिदोष वर्णनांतील 'ते व्यापिनः, या वचनाप्रमाणें सर्व शरीरव्यापी असावें हें सहज आहे.  अभिसरणाचा तिसरा प्रकार म्हणजे ताबडतोब शरिराच्या कोण