पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५
पित्तविकारापैकीं ज्वर.


त्याही विशिष्ट विभागामध्ये एकाद्या धातूची वाढ अथवा व्हास किंवा वैषम्य हा होय. शरारोपयोगी पदार्थामध्ये कांहीं पदार्थच असे आहेत. कीं ते खाल्याबरोबर कोणत्या तरी एका विशिष्ट भागांत, सामान्य नियमाला सोडून कार्य करतात. हें कार्य क्वचित् रोगोत्पादक अर्थात् अनिष्ट किंवा रोगविनाशक म्हणजे इष्टहि असेल सद्यः फलदायी औषधांची अथवा व्याधिप्रत्यनीक चिकित्सेची उभारणी याच पदार्थांच्या गुणांना अनुरून केलेली आहे. या गुणांना ' प्रभाव' हें आयुर्वेदीय नांव आहे. हा तिसरा प्रकार प्रभावात्मक असल्याकारणानें विशेष वर्णनीय नाहीं. तथापि द्रव्यांतर्गत अशा या प्रभावानें जरि त्या द्रव्याचें कार्य 'वृष्यादीनि प्रभावेण सद्यः शुक्रादि कुर्वते ' ( शुक्रवर्धक वगैरे पदार्थ केवळ प्रभावानेच तत्काल शुक्रादि धातूंचीं वर्धक होतात अ. हृ.) या नियमान्वयें निरनिराळ्या धातूंमध्ये होत असले तरी असल्या द्रव्याचा प्रवेश धातूंमध्ये झाल्यावर तें आत्मसात् करून घेण्यासाठी पुन्हां धात्वाश्रयी पित्ताची आवश्यकता आहेच एरवी कितीही शीघ्रकारी द्रव्य असले तरी त्याचा प्रभाव ताबडतोब धातुप्रवेशाला उपयोगी झाला पण आत्मीकरणाला पित्ताची अगर स्थानीपाचक परमाणूची गरज आहे म्हणजे रसविक्षेपापासुन होणाऱ्या धातुपोषणाला, पूर्वधातूपासून उत्पन्न होणाऱ्या धात्वंतराला किंवा प्रभावजन्य कार्याला एकूण या तीनहि प्रकारामध्ये पित्ताची आवश्यकता अनिर्बंध असते. या तीन अवस्थांमध्ये पित्ताची क्रिया कमी झाल्याने होणाऱ्या विकारांची ठळक उदाहरणें ह्मणजे पहिल्या प्रकारामध्यें राजयक्ष्मा किंवा कफक्षय, दुसऱ्यांत मेदोवृद्धि आणि तिसऱ्यामध्ये रोगाची असाध्यता व सुजेची पक्वावस्था हीं होत. रसधातूंमध्ये पित्ताची उणीव म्हणून योग्य पचन किंवा सारकिट्टांचें विभाजन न झाल्यानें स्त्रोतोरोध

'रसोऽप्यस्य न रक्ताय मांसाय कुत एवतु । '

 या (राजयक्ष्मा) च्या रसापासून रक्तच होत नाहीं मग मांस कोठून होणार ? अ हृ. याप्रमाणे धातूंची उत्पत्ति होत नाहीं. दुसऱ्या प्रकारांमध्ये स्निग्धाहारी व अव्यायामशील मनुष्याचे भेदामध्यें पाचक तत्वाचा अभाव झाल्यानें भेदाचें सारकिट्ट विभाजक न होतां एकाच धातूची अनैसर्गिक वाढ झालेली दिसून येते व अर्थात् पुढील धातूमध्ये कमतरता येते. तिसन्या प्रकारामध्यें ज्यावेळी कितीहि प्रभावशाली औषध उयोगांत आणिलें, त्याचे प्रभावाने त्या भागांत ते पोचावें तेथे पोचलेंहि पण जर तेथील सात्मीकरणाचे तत्त्व क्षीण झालेंतर त्या औषधांचा कांहींच उपयोग न होतां एकाला उत्तम गुणकारी असणारा पदार्थ दुसन्याला निर्गुणी होतो व म्हणूनच, रोगाच्या असाध्य अवस्थेमध्यें ' अक्षनाशन ' म्हणजे इंद्रियनाश करणारा असाध्य असा उल्लेख