पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



आहे. आणि चिकित्सा करतांना, साध्यासाध्यता, रोगाची वाढ, स्थैर्य किंवा कमी होण्याची प्रवृत्ति यांपैकी ह्मणजे शास्त्रीय भाषेत आम, पच्यमान व पक्वावस्था ही अवस्थांतरें, उत्पत्ति आणि प्रगति याचा वेग इत्यादि गोष्टी समजून ध्यावयाच्या ह्मणजे इंद्रियांच्या शक्तीचें व कार्याचेंच सूक्ष्मावलोकन करावयास पाहिजे. निरोगी शरिरा 'स्वस्थहित' ह्मणजे पथ्य पदार्थांनी वाढ होण्यासाठी त्याचप्रमाणें रोगी शरिरांतील विकृति घालविणाऱ्या शमन द्रव्यांचें रोगविनाशक कार्य घडवून आणण्याकरितां, त्याचप्रमाणे रोगोत्पादक पदार्थांचे शरिराचे त्या त्या भागा वरील कोपन कार्य घडत असतां या तत्स्थानीय पित्ताची ह्मणजे पाचक परमाणूंची किंवा पाचक पिंडांची इतकी अवश्यकता ध्यानी घेतल्यावर
 'विकृता घ्नंति आणि अविकृता वर्तयति' हैं सत्य असल्याची खात्री होईल. उत्तम पोषक असा पदार्थ आरंभीं ज्या भागाचा पोषक त्या भागापर्यंत जाऊन त्याला चिकटल्या शिवाय ज्याप्रमाणे तो निरुपयोगी आणि हें चिकटविण्याचं, भर घालण्याचे व आयुर्वेदानें विसर्ग नांव दिलेले पोषक कार्य क्षेपणात्मक परमाणु समुदायरूपि कफानें केलें जातें, त्याचप्रमाणे अशा संग्राहत पदार्थांचे शारीरिक पदार्थांशी पूर्ण तादात्म्य करून त्यांचें सारकिट्ट विवेचन करण्याचें कार्य झाल्याशिवाय हा संग्रह निरुपयोगी होऊन शारीरस्वाथ्य राहणार नाहीं. शरिराच्या प्रत्येक लहान मोठ्या भागामध्ये ही क्रिया सुव्यवस्थित चालून आरोग्ययुक्त असें त्याचें संवर्धन होतें. अव्यवस्थित झाल्यास व्याधिसंभव, आणि व्याधिविनाशक पदार्थाचा उपयोग करून पुनरारोग्य अशा क्रिया करणारे हें पित्त ह्मणजे पाचक तत्व होय. आणि तें ज्या जातीच्या पदार्थांचे आश्रयाने राहतें, त्या पदार्थांचें 'सस्नेहतीक्ष्णोष्णं ' हें वर्णन आहे. वांतींतून पडणान्या पित्तालाच आयुर्वेदीय पित्तदोष मानून समजुतीचा विपर्यास करणारांनी या गोष्टीकडे आधी लक्ष द्यावें. वांतींतून पडणान्या पित्ताचा खुलासा 'अम्लपित्त या विकाराचे स्पष्टीकरणांत केला आहे. आयुर्वेदांतील पित्ताची यथार्थता ध्यानीं येण्याला या सर्व गोष्टी ध्यानी घेऊन हें पित्त म्हणजे शरिराच्या विविध विभागांच्या विचित्र रचनेनुसार कमी अधिक प्रमाणानें सर्वत्र व्यापून राहिलेल्या पचनसामर्थ्यसंपन्न परमाणूंचा समुदाय होय. सोयीसाठी याला पाचकत्व नांव द्यावें. याचें मुख्य कार्य आरंभींचे श्लोकांत सांगितलें आहे. तें आदान होय. आदान ह्मणजेच विसर्ग किंवा पोषणानंतर त्या पदार्थांचे पाचन, शोषण अथवा विभाजन होय, व हें कार्य सर्वत्र होतें. तें ज्याने केले जाते त्याचे यथार्थ नांव आयुर्वेदियांनीं पित्त ठेविलें आहे. पित्त ह्मणजे वांतींतून पडणारा मळहि नव्हे आणि केवळ कल्पनागम्य शक्तिहि नव्हे तर शक्तिसंपन्न