पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
वायु.



असे शरिरांतील सूक्ष्म परमाणु होत. शरिरामध्ये हे परमाणु केव्हांहि अन्योन्याश्रयीच राहतात. अशा पित्ताला वर्णनाचे आणि शरिरांतील अनेकविध क्रियांचे स्पष्टीकरणासाठीं शोषक पिंड पाचक पिंड किंवा विभाजक पिंड अथवा परमाणु नांव दिल्यास चालेल.

____________
वायु.

 आयुर्वेदाचे मूल तत्वांपैकी तिसरें व मुख्यतत्व वायु हैं होय. या शब्दाचा अर्थ गतिमान पदार्थ असा आहे. ' वा ' या गत्यर्थक धातूपासून हा शब्द तयार झाला आहे. शरिराची उत्पत्ति आणि वाढ मागें सांगितल्याप्रमाणे पंचभौतिक परमाणूंचा संग्रह किंवा विसर्ग आणि आदान किंवा शोषण अथवा पचन या अनुक्रमें कफ आणि पित्त या दोन दोषांनीं झाल्यावर त्याच परमाणूंना गतीची अवश्यकता असते. अशासाठीं कीं, स्वीकृत असे परमाणु हे शरिराच्या अनेकविध आणि परस्पर विसदृश अशा भागांमध्ये पोचवावे लागतात. अर्थात् हैं त्या परमाणूंचे स्थलांतर होण्याला गतीची आवश्यकता असते. आहार्य पदार्थ जिभेवर ठेवल्यापासून त्याचा अंतःप्रवेश होऊन निरनिराळ्या घटकांत रूपांतर होईपर्यंत हे पोषक परमाणु फिरत्या स्थितीमध्ये असतात. व ही जी फिरण्याची शक्ति ही अर्थातच वायूची असते. अनेकविध आहाराचे रस धातूमध्ये रूपांतर झाल्यावर तो रस सर्व शरीरभर पसरविणें, किंवा फेंकणे, त्याचप्रमाणे एका धातूंतून दुसन्या धातूमध्ये पोषकांचें गमन हैं वायूनें ह्मणजे गतिविशिष्ट अशा सामर्थ्यसंपन्न व सूक्ष्म अशा अनंत परमाणूंनीं होतें. हें एक प्रधान कार्य असून त्याबरोबरच शरिरांत कार्य करून निःसत्व अर्थात् मळरूपी जे निरुपयोगी पदार्थ असतात, त्यांना शरिराबाहेर फेंकून देणें हेंहि तितक्याच महत्वाचें गतीचें कार्य आहे. त्याचप्रमाणे शरीरव्यापार जे चलनवलन श्वासोच्छ्वास चालणें, वोलणे इत्यादि स्थूल व स्पर्श आणि संवेदना असे सूक्ष्म त्यांचेहि कर्तृत्व गतिमान् पदार्थाकडेच असते. व या त्रिविध अशा महत्वाचे आणि शरिराचे अस्तित्वाला आधारभूत क्रियांचे कर्तुत्व ज्या गतिसामर्थ्यसंपन्न तत्वाकडे आहे त्याला अन्वर्धक असे गतिवैशिष्ठ्याचें निदर्शक वायु हैं नांव देऊन त्याचा मुख्य तत्वांमध्येहि प्रामुख्याने उल्लेख करणे आयुर्वेदीय शारीरशास्त्राला अवश्य वाटणें अस्वाभाविक नाहीं. गतीशिवाय मग ती स्थूल दृष्टीला गम्य असो वा सूक्ष्म दृष्टीचा विषय असो- अस्तित्व नाहीं, हैं उघड होते. शरीरामध्ये या गतितत्वाचा कार्यभाग कसा आणि कोणत्या स्वरूपाने होतो याविषयीं स्पष्ट बोध होण्यासाठीं वायूचें स्वरूप व त्याबरोबरच शारीरिक परमाणूंचे सामान्यस्वरूपहि ध्यांनी घ्यावयास पाहिजे.