पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


वायु म्हणजे काय ?



 'वायु, म्हणजे दृष्टीला अगम्य असे स्पर्शानुमेय सूक्ष्म परमाणु होत. याविषयीं कोणाचाच वाद नाहीं. ' रूपरहित स्पर्शवान वायुः, ह्मणजे ज्याला रूप नाहीं व ज्याचें अस्तित्व स्पर्शानुमेय आहे, असा वायु असतो. हा नैय्यायिकांचा सिद्धांत आहे, एक गोष्ट लक्षांत ठेवण अवश्य आहे ती ही कीं, पंचमहाभूतांचे तात्विक शुद्ध स्वरूप हें इंद्रियगोचर असत नाहीं. तर 'व्यपदेशस्तु भूयसा ' या न्यायाने गुणांचे आधिक्यावरून तत्तद्विशिष्टपदार्थ ओळखले जातात. पृथ्वी, आप, तेज ही महाभूतें अनुक्रमें गुरुत्व, आर्द्रत्व, व प्रकाशित्व या गुणांची खरी पण ती पृथक्तया उपलब्ध नसून अन्योन्याश्रयी असतात. व त्याप्रमाणें वायूचा मुख्य धर्म जरि 'गति' हा आहे, तथापि ही गति अतिसूक्ष्म कां होईना पण परमाणूचे आश्रयानेंच राहते. या गतीचे आश्रयीभूत जे सूक्ष्म परमाणु त्यांना वायु हें नांव आहे. हे परमाणु अर्थातच आकाश अथवा पोकळी यांमध्ये राहतात. व 'आकाशात् वायु, हा सिद्धांत याच तत्त्वाचे प्रतिपादन करीत आहे. त्यांतहि अगदी शुद्ध शास्त्रीय विवेचनामध्ये जरि अमिश्रस्थितींतील पंचमहाभूतें वर्णनासाठी विवक्षित असली तरि-'पंचमहाभूतशरीरिसमवाय स्वरूपि' अर्थात् विशिष्टप्रतीचें पांचभौतिक मिश्रस्वरूप असलें जें शरीर त्यांमध्ये असणारीं जीं पंचतत्वें त्यांचें शरीरस्थिति-निवर्तक वर्णन हैं अमिश्र नसून मिश्रस्थितींतील व आधिक्यावरूनच निर्दिष्ट असावयाचे. या तात्विक दृष्टीने विचार केला म्हणजे शरीरांतर्गत वायु हा सूक्ष्म परमाणूंचा आश्रित व तदाकार पदार्थ आहे, हें सहज ध्यानीं येईल. सामान्य नियमाप्रमाणे असल्या वायूचे अस्तित्वालाहि त्याचे प्रमाणानुरूप आकाशाची-अवकाशाचीआवश्यकता आहेच व शरिरांत जें कोटिशः विभक्त आकाश म्हणजे लहान मोठीं अनंत स्रोतसे हे वायुचे निवासस्थान होय. शरीर हें सर्वथा स्रोतोमय आहे. अन्नमार्ग, मलमार्ग, श्वासमार्ग वगैरे जसे स्थूल स्रोतोमार्ग आहेत, त्याचप्रमाणें प्रत्येक परमाणूंमध्येहि मार्ग पाहिजे. शरीरपोषक असें शुद्ध रक्त आंत येण्यासाठीं आणि पचनानंतर मलरूपि पदार्थ बाहेर टाकण्यासाठी हा शरीरघटकांचा समुदाय स्त्रोतोमयच असणें अवश्य आहे. आणि तसा तो आहे. म्हणूनच चरकामध्यें ' स्रोतसामेव समुदायं पुरुषमिच्छति' असें शरीराचें वर्णन आहे. हीं स्रोत इतकी आहेत कीं, त्यांमुळे स्रोतः समुदाय म्हणजे शरीर अशी शरिराची व्याख्या केली. अगदी व्यावहारिक भाषेत बोलावयाचे तर शरीर म्हणजे एक सच्छिद्र परमाणूंचा समुदाय असें म्हणतां येईल. हि स्रोतसें किंवा सच्छिदें वायूनेंच भरून राहिलेली असतात. यांमध्ये जर