पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई.


.७१
शरीरांतील हालचालीचें प्राधान्य व क्रम




वांशाचे आधिक्याने निर्माण झालेल्या पंचभौतिक शरीरांत सच्छिद्रता आहे व ह्मणूनच

" क्ष्मामधिष्ठाय जायते "
अंबुयोग्यग्निपवननभसां समवायतः ॥
तन्निवृत्तिर्विशेषश्च व्यपदेशस्तु भूयसा ॥ १ ॥ ”


(कोणतेहि द्रव्य पृथ्वीचे आधारें, पाण्याचे मुख्य साधनाने व तेज, वायु आणि आकाश यांचे सामुदायिक अंशांनी उत्पन्न होते. त्याचा उल्लेख मात्र अधिक अंशानें असलेल्या महाभूतांचे नांवानुसार करण्यांत येतो. )
 अशा प्रकारे कोणत्याही द्रव्यासंबंधीं खुलासा मांगें केला आहेच. सर्व शरीर हा एक सच्छिद्र घटकांचा समुदाय आहे. हें तत्त्वहि, या गतितत्वाचेच बोधक आहे. सूक्ष्म स्रोतसांत असलेल्या या सूक्ष्मस्वरूपी गतिमान परमाणूंची जी सदैव हालचाल चालू असते, तिचा परिणाम प्रथम या स्रोतसांवर ह्मणजे त्यांतीलहि सूक्ष्म भागावर होतो, त्यानंतर असल्या स्रोतस्समुदायाचा बनलेला जो भाग ह्यणजे शरिराचा एकादा अवयव त्यावर, त्यानंतर त्याचे समीपवर्ति अशा दुसऱ्या भागावर आणि अशा परंपरेनें सर्व शरिरावर होतो. व या क्रमानें सर्व शरिराच्या हालचाली घडतात. बाहेरून - स्पर्शघातादिकांनी ज्यावेळी एकाद्या भागाला गति दिली जाते, त्यावेळी स्वाभाविकपणेंच तो एकच भाग अधिक कार्यकारी होतो. शिवाय या त्रिदोषांशिवाय शरिरांत मनाचा एक प्रभाव मानावा लागतो. मन जरि इंद्रियगोचर नाहीं, तरि त्याचे अस्तित्वच काय पण कार्यकारित्वहि मानल्याशिवाय भागत नाहीं. इतकेच नव्हे तर कोणत्याहि क्रियेचें प्रवर्तक मन आहे, असाच सिद्धांत सूक्ष्म विचाराअंती पटण्यासारखा आहे. विविध मनोभावना या शरिराच्या विवक्षित भागावरच कार्यकारी होतात, हें सहज कळण्यासारखे आहे. शरीर व मन ह्यांचा अन्योन्यसंबंध, मनाची श्रेष्ठता, हा विषय सूक्ष्म आणि सध्या त्याचा विचार मुख्य नसल्याने सर्वेन्द्रियांचे मुख्य प्रेरक मन आहे ही सिद्ध गोष्ट गृहीत धरून त्याचा प्रस्तुत त्रिदोषांशी काय व कसा संबंध आहे याचाच विचार करावयाचा आहे. आनंद किंवा शोक यांमध्ये उत्तेजित झालेल्या भावनांचा परिणाम विशेष प्रकारें अश्रुवाहिनींवर होतो. भीतीचा परिणाम आंतड्यांवर होऊन जुलाब होतात तिरस्काराने ललाटत्वचा संकुचित होते, तर आश्चर्यानें नेत्र विस्फारित होतात, विचारांत गढलेला माणूस, कोणी ऐनैच्छिकरीत्याच डोके खाजवू लागतो तर कोणाच्या डोळ्यांचे ऊर्ध्वप्रांत संकुचित किंवा डोळे अर्धवट मिटून अंतर्मुख दृष्टीचें सहज अनुमान करता