पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
वायूचे महत्त्वाचें वर्णन.

 धातु नवीन सजातीय घेतो. तेथें त्याचें पृथक्करण होतें. निरुपयोगी झिजकट भाग टाकून दिला जातो. पुन्हां या व्यापारांत मिळविलेला पदार्थ त्याहून स्वच्छ होण्यासाठी दुसऱ्या धातूंत टाकिला जातो; अशी सारखी प्रणाली चालू असून या सर्वांत हालचाल, संकोचविकास हैं आद्य कारण आहे आणि हालचाल स्रोतोनिष्ट वायूची. विधात्याने शरीरांत एकदां किल्ली देऊन आयुर्मर्यादिकृत्य पुरेल अशी श्वासोच्छ्वासरूपी गति निर्माण करून ठेविली आहे. या क्रियेनें शरिरांतर्गत सर्व स्रोतसांचा संकोच आणि विकास होऊन त्यांची गतिपरंपरा कायम राहते, व शरीराचे सर्व व्यापार सुरळीतपणे चालतात. अशा प्रकारें गति उत्पन्न व्हावयाची ह्मणजे या वायूचे अणूंचा आघात प्रत्याघात अव्याहत चालावा लागतो. एक भाग संकुचित झाला कीं, त्यांतील परमाणूंचा दुसन्या टोकांतील परमाणूंवर आघात होऊन हैं सातत्य ( अखंडितता ) कायम राहतें. आणि या क्रियासातत्यामध्ये ज्या मानानें न्यूनाधिक्य उत्पन्न होईल त्यामानाने शरीरामध्ये विकृति उत्पन्न होते. ह्या कारणामुळे शारीरिक क्रियांचे सुस्थितीला व शरिराचे स्थैर्याला गति साम्य मुख्य साधन आहे, असा प्राचीन शारीरशास्त्रवेत्यांनी सिद्धांत प्रस्थापित केला आहे. गतिसाम्य ह्मणजेच वायूचें साम्य व यामुळे आयुर्वेदीयांनीं वायूचे अविकृतपणावर शरीरारोग्याची सर्व इमारत उभारली आहे.

___________
वायूचे महत्वाचें वर्णन.
अव्याहत गतिर्यस्य स्थानस्थः प्रकृतिस्थितः ।
वायुः स्यात्सोऽधिकं जीवेद्वीतरोगः समाः शतम् ॥ १ ॥


( मा. नि. )

  ( ज्याचा वायु हा दोष स्वस्थानीं स्वप्रमाणांत व अनिरुद्धगति असा असेल तो निरोगी राहून पूर्ण शंभर वर्षे बांचेल. )

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावताम् ।
यत्र संगः स्ववैगुण्यात् व्याधिस्तनोपजायते ॥ १ ॥


( चरक )

 ( दोष कुपित होऊन ते सर्व शरीरभर पसरत असल तरी शरी राच्या ज्या एकाद्या विकृत अशक्त-भागांत त्यांना अडथळा होईल तेथें रोग होतो. )

शिष्यमाणः स्ववैमुण्याद्रसः सजति यत्र सः ।
तस्मिन् विकारं कुरुते स्वेवर्षमिव तोयदः ॥ १ ॥

( अ.ह.)

आ.... ४