पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 ( नेहमी फिरणारा रसधातु ज्या विकृत भागांत अडेल त्या ठिकाणीं विकार उत्पन्न करितो. आकाशांत फिरणारा मेघ अडल्या ठिकाणी वर्षा करितो त्याप्रमाणें. )

शाखागताः कोष्ठगताश्च रोगा मर्योर्ध्वसर्वावयवांगजाश्च ।
ये संति तेषां नतु कश्चिदन्यो वायोः परं जन्मनि हेतुरस्ति १
विश्लेष्मपित्तादिमलाचयानां विक्षेपसंहारकरः स यस्मात्
( अ.ह.)

 ( शाखा, कोठा, ममें, त्याचप्रमाणें ऊर्ध्वभाग ( जत्रूचे वरचा ) आणि इतर सर्व अवयव यांचे जे विकार त्यांचे उत्पत्तीला वायूशिवाय दुसरें कारण नाहीं. कारण वायु हा मल, श्लेष्मा ( कफ ) इत्यादि मलांचा विक्षेप ( उत्सर्जन ) व नाश करणारा आहे. )

विभुत्वादाशुकारित्वाद्वलित्वादन्यकोपनात् ।
स्वातंत्र्याद्वहुरोगत्वाद्देोषाणांप्रबलेऽनिलः ॥ १॥
( अ. ह, )

  सामर्थ्य, शीघ्रकारिता, बलिष्टपणा, अन्यदूषकत्व, स्वातंत्र्य आणि बहुरोगकारिता, यांमुळे सर्व दोषांत वायु हा प्रबल आहे.

पित्तं पंगुः कफः पंगुः पंगवो मलधातवः ॥
वायुना यत्र नीयते तत्र गच्छंति मेघवत् ॥ १ ॥ ( चरक.)

 पित्त पंगु आहे, कफहि पंगु आहे आणि इतर धातु व मलहि पंगु आहेत. हे सर्व वायु नेईल त्या ठिकाणी, मेघाप्रमाणे जातात. ( सामर्थ्य वायूंत आहे. )
 त्याचप्रमाणेः -- वायुस्तंत्रयंत्रधरः प्रवर्तकश्चेष्टानामुच्चावचनां, सर्वेन्द्रियाणाद्योगकरः इत्यादि. ( चरक. )  वायु हा शरीराच्या सर्व लहानमोठ्या व्यापारांचा प्रवर्तक व सर्व इंद्रियांचा प्रवर्तक वगैरे वर्णन आहे. वरील वायूचे गुणवर्णनाचीं वाक्यें ध्यानी घेतली असतां, आयुर्वेदीयांनीं वायूला इतके महत्त्व कां द्यावें याचा उलगडा होतो. शरीराचा जिवंतपणा, त्याचें स्थित्यंतर व यांमध्यें घडणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिया, कोणत्याहि शरीरविभागांत व कितीहि लहानमोठया प्रमाणाने झाल्या तरी त्या, त्या भागांतील गतिमान् पदार्थांच्या सहाय्याशिवाय होत नाहींत व हाच पदार्थ म्हणजे आयुवेदांतील अन्वर्थक नामधारी वायु होय. आणि याच हेतूनें त्याला इतकें महत्व असून आरंभींचे लोकांत विक्षेप-फेकर्णे- हें त्याचे मुख्य काम याच उद्देशाने सांगितलें आहे. शरीराचे सर्व भागांत ही विक्षेपणाची क्रिया लहानमोठ्या प्रमाणाने होणारी असल्याने ' ते व्यापिनः ' या सामान्य नियमान्वयें वायु हा सर्व शरीरव्यापी असल्याचे सिद्ध होतें.