पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वायूची मुख्य स्थानें.

 सर्व शररिराचें पदार्थशः वर्गीकरण करूं लागल्यास, रस, रक्त, मेद, मज्जा, शुक्र इत्यादि द्रव पदार्थ, कठीण अस्थि, मांस, स्नायु हे घनस्वरूपी आणि सर्वव्यापी सूक्ष्म तंतु असे करतां येईल. आणि या सूक्ष्म तंतुमय भागावरच प्रथम परिणाम होतो. गतिमत्ता ही विशेषतः या भागांत असते. तरी वायु हा शरीरांतील सूक्ष्म छिद्रांमध्ये असतो. शरीरांत मुख्य कार्ये दोन. एक अभिसरण व दुसरें गति. अभिसरण द्रव पदार्थांचे, आणि वायूची गति हीं दोनहि कार्यें शरीरांतील स्रोतसांचे सहाय्याने घडतात. अशा या स्त्रोतसांतील गति ही त्यांतीलच एका भागांत असणाऱ्या संवेदनावाहक तंतूंचे आणि वायूचे सहाय्यानें उत्पन्न होऊन तीमुळे शरिराच्या क्रिया घडतात. अशा रीतीनें गतिमान शरिरांत वायूची सर्वव्याप्ति उघड होते. वायूचे वास्तव्याला स्रांतसें - छिद्रे - पाहिजेत. मग ती अस्थींच्या कठीण भागांतील असोत किंवा मृदुपेशीय भागांतील असोत. पोकळी अगर सच्छिद्रता पाहिजे मात्र खास. ( आकाशात् वायुः ) वायूचे वास्तव्याला पोकळीची अवश्यकता आहे, असे ठरल्यावर मग ज्या ज्या भागांत पोकळी अधिक तेथे वायूचे वास्तव्य अधिक प्रमाणांत असा सहजच नियम ठरतो. आणि याच तत्वाला अनुसरून वायूचीं मुख्य स्थानें सांगितली आहेत:-ती येणेप्रमाणे:--

__________
वायूची मुख्य स्थानें.
पक्काशयकट सिक्थिश्रोत्रास्थिस्पर्शनेंद्रियम् ॥
स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः ॥ १ ॥
( अ.हृ.)

 ( १ ) पक्वाशय म्हणजे स्थूलांत्र किंवा मोठे आंतर्डे, (२) कटी म्हणजे श्रोणिमंडल किंवा नितंबास्थि, भगास्थि, त्रिकास्थि यांनी तयार झालेली गुहा, (३) सक्थि म्हणजे तंगडी-यांतील स्नायु-यांत हाताचाहि समावेश होतो. ( तात्पर्य, हात व पाय यांतील स्नायु.), (४) श्रोत्रेंद्रिय म्हणजे कर्णकहर - गुहा. ) ( ५ ) अस्थि- हाडांतील पोकळी-सच्छिद्रता. ( ६ ) त्वचा स्पर्शेद्रिय-त्वचेंतील सूक्ष्म स्रोतसें. हीं शरिरांत वायूची मुख्य स्थानें असून या मुख्य स्थानांतहि पक्वाशय मुख्य आहे. कारण या भागांत सर्वांहून पोकळी अधिक आहे. या सहा स्थानांशिवाय वायूची आणखी विशिष्ट क्रिया ज्यांपासून होतात अशी स्थाने आहेत ती:--
 ( १ ) मेंदु ( २ ) ऊर म्हणजे फुप्फुसे ( ३ ) हृदय ( ४ ) पच्यमानाशय म्हणजे लघ्वंत्रे आणि ( ५ ) अपान म्हणजे गुदमार्ग वगैरे अधोभागांतील उत्सर्जनेंद्रियांचे मूलस्थान. याप्रमाणे वायूची मुख्य