पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 अशी एकंदर अकरा स्थाने शरीरांत सांगितली आहेत. पैकी पहिल्या सहा स्थानांतील वायूच्या क्रिया स्थूल व गतिमूलक असून दुसऱ्या पांच स्थानांतील संवेदनामूलक आहेत.
 या सर्व अकराहि स्थानांतील वायूची कार्ये जरी अनेक प्रकारची सांगितली आहेत, तरी त्यांतील सर्वव्यापी मुख्य तत्व गति हेंच आहे. प्रत्येक स्थानाची रचना, आणि कार्य यांना अनुसरून या गतीमध्ये विविधता आलेली असते. आयुर्वेदाने शरीराचे क्रियांशी वायूचा संबंध सांगत असतांना अप्रत्यक्षपणे असा खुलासा केला आहे:--

दोषधातुमला मूलं सदा देहस्य तं चलः ॥
उत्साहोच्छ्वासनिश्वासचेष्टावेगप्रवतनैं ॥
सम्यग्गत्या च धातूनामक्षाणां पाटवेन च ॥

अनुगृण्हात्यविकृत: ॥ ( अ.हृ.)


दोष, धातु आणि मळ हे शरीराला मूलभूत आहेत. त्यांपैकी वायु अविकृत असतां, सर्व इंद्रियांचे ठिकाणीं उत्साह हाणजे कार्योन्मुखता श्वासोश्वास, कर्मेद्रियांचे व्यापार, मलमूत्रादींचें वैगोत्सर्जन, शरीरधातूंचे व्यवस्थित आदान विसर्जन ( घेणें देणें. ) आणि इंद्रियांमध्ये तरतरी-लाघव, या क्रियांनी देहाला उपकारक होतो असें सामान्यत्वें वायूचें कर्तृत्व वर सांगितले आहे. या वायूच्या देहोपकारक ज्या क्रिया सांगितल्या आहेत, त्यांमध्ये जर विविध प्रकार स्थूलतया दिसत असले तर या क्रियांचे संपादकत्व मुख्य जो वायूचा गतिधर्म त्याकडेच आहे, ही गोष्ट थोडयाशा विचाराने ध्यानांत येण्यासारखी आहे. अशा प्रकारें आयुर्वेदांतील वायु ह्मणजे शरीराच्या सर्व लहानमोठ्या भागांत हालचाल, गति, ज्यामुळे उत्पन्न होते, असे सर्वव्यापी विरल अणु होत. व्यावहारिक भाषेत या अणूंना उत्सर्जक अणु असें नांव देण्यास हरकत नाहीं. श्लेषक किंवा पूरक पिंड अथवा घटक ह्मणजे श्लेष्मा किंवा कफ, पाचक किंवा विभाजक पिंड अथवा घटक ह्मणजे पित्त व प्रेरक किंवा उत्सर्जक असे अणु ह्मणजे आयुर्वेदांतीस वायु समजावयाचा.

__________


वायूला पिंड नांव योग्य नाहीं.

 कफ व पित्त यांप्रमाणे वायूचे अणूंना घटक हे नांव देणे सयुक्तिक नाहीं. कारण पिंड या शब्दाने अनेक अणूंच्या सामुदायिक स्वरूपाचा बांध होतो. व या शब्दानें श्लेषण किंवा चिकटणें या अर्थाचा बोध अभिप्रेत असतो. वायूचे स्वरूप याचे उलट. त्यांत संश्लेष संयोग तर नाहीच. पण विश्लेषण किंवा उत्सर्जन-वियोग- हेंच मुख्य वायूचें