पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 वायूचीं. व घन जड अस्थीमध्ये त्याचें विशेष वास्तव्य असल्याशिवाय हीं कार्यें होणारी नाहींत. ही वायूची, अस्थीतील अवश्यकता दाखविण्यासाठी अस्थींचा वातस्थानांत समावेश केला आहे. दृश्य अशीं वायूचीं कायँ येथे घडत नाहींत. अस्थीमध्येंहि सर्वांत वायूचे प्रमाण सारखें असतें असें नाहीं. नलकास्थि-नळ्यांची हाडें यांत हे प्रमाण अधिक असून कपालास्थींमध्ये तें कमी असतें. तथापि सर्वत्र तें असतें, ही गोष्ट खरी आहे, शरीरामध्ये वायूचें प्रमाण वाढलें असतां, अस्थींवर प्रथम परिणाम होतो. त्यांतहि नलकास्थींवर आधीं होतो. अस्थि कठीण असल्यानें त्यांताल छिद्रांमध्ये वायूचें स्वतंत्र वास्तव्य असतें. याच उद्देशाने शरीराचे धातूंपैकीं अस्थि वायूचें दूष्य म्हणून सांगितलें आहे.

तत्रास्थानि स्थितो वायुः
___________

 ६ वायूचें सहावें स्थान स्पर्शनेंद्रिय किंवा त्वचा हैं होय. त्वचेमध्ये असणाऱ्या वातवहक अशा सूक्ष्म स्रोतसांवर बाह्य आघाताचा परिणाम होतो. आणि याच्या निकट असलेल्या ज्ञानवाहिनीवर मागून परिणाम होतो. हीं सूक्ष्म स्रोतर्से, सूज किंवा अशाच एकाद्या कारणाने संकुचित झाली कीं, त्या मानानें स्पर्शज्ञान कमी होते. ही अनुभवाची गोष्ट आहे. शरीराच्या सर्व अवयवांमध्यें, असलेल्या स्रोतसांत स्थूलपणे जर भेद पाडावयाचे झाले, तर एक प्रवाही पदार्थ वाहणारी व दुसरीं विरलांचे मार्ग असे पडतील व हा दुसरा वर्ग म्हणजेच वातवाहक स्रोतसें होत. प्रत्येक शरीरभागामध्ये धमनी आणि शिरा किंवा शुद्ध रक्तवाहिन्या व अशुद्ध रक्तवाहिन्या यांचे अस्तित्व जितकें अवश्य तितकेच वातवाहिन्यांचे अवश्य आहे. शेवटी शेवटीं या इतक्या सूक्ष्म झालेल्या असतात कीं साध्या डोळ्यांनीं त्यांचे स्पष्ट स्वरूप समजणं अशक्य असतें. परंतु सर्व शरीराच्या कोणत्याहि भागाला निरंतर अभिसरण आणि संवेदना यांची अवश्यकता असते. वातवाहिनी म्हणजे संवेदनावाहक आणि रक्तादि द्रव पदार्थ वाहणाऱ्या स्रोतसांना रसायनी अशी नांवें अनुक्रमें या स्रोतसांना शास्त्रीय व्यवहाराचे सोईसाठीं देतां देतील. त्वचेमध्येहि हीं स्रोतसें अशींच अतिसूक्ष्म स्वरूपाची आहेत. स्पशेंद्रिय हे पित्ताचे स्थान असल्याचाहि उल्लेख आहे. स्वेद किंवा बाष्प वाहणारी स्रोतसें म्हणजे पित्तस्थान व संवेदनावाहक स्रोतसे वातस्थान होय.

___________