पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१
संवेदनात्मक वातस्थाने.



संवेदनात्मक वातस्थानें

 याशिवाय वायूच्या विशेष क्रिया ज्या ठिकाणी अधिक प्रमाणांत घडतात अशी ठिकाणे म्हणजे मस्तक, ( ज्ञानवाहिनीचे उगमस्थान. ) उरः प्रदेश, (फुप्फुसे ) हृदय, लहान आतडी आणि मलमार्ग हीं होत. पैकीं मस्तकांतून ज्ञानतंतूंचे कार्य वायूचे केवळ संवेदनात्मक शक्तीनें घडत असतें. स्पर्श किंवा आघात यांनी उत्पन्न झालेल्या अथवा ऐच्छिक किंवा अनैच्छिकरीत्या निर्माण झालेल्या संवेदनेची, शरीराचे निरनिराळ्या भागांत व ज्ञानवाहिनींचें मुख्य केंद्र व आरंभस्थान जो मेंदु यांमध्ये देवघेव करण्यासांठीं. जी एकप्रकारची सूक्ष्म हालचाल व्हावी लागते ती हालचाल - गति अर्थातच असल्या विरलाणूंच्या स्वाधीन असल्याने ह्या क्रियेचें कर्तृत्व वायूकडे सांगण्यांत आले आहे. मेंदूचे निरनिराळ्या विभागांत निरनिराळ्या भावनांचे उत्पादकत्व असून भावनोत्पादन असें मन केवळ तर्कानुमेय किंवा कर्मानुमेय हें खरें असले तरी ही भावना उत्पन्न होते मेंदूचे त्या त्या विभागांतील होणाऱ्या हालचालीचा परिणाम ह्या भागाशी केंद्रीभूत झालेल्या ज्ञानवाहिन्यांवर होतो. ही हालचाल गतिविशिष्ट अर्थात् वायूची असल्याने मस्तक किंवा मेंदु हैं एक वातस्थान सांगितलें आहे. याला प्राणवायु हैं नांव आहे.

 या वायु हैं स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्याचें वर्णन करीत असतां .

'बुद्धिहृदयेंद्रियचित्तधृक् ।
ष्ठीवनक्षवथुद्वारनिश्वासान्नप्रवेशकृत् ॥ (अ. हृ )


 हा वायु, बुद्धि, हृदय, सर्व इंद्रियें, चित्त यांना धारण करणारा (आधार) व थुंकणे, शिंकणे, ढेकरा देणे, श्वासोच्छ्वास आणि अन्नप्रवेश ह्मणजे घशांतून अन्न उतरविण्याची क्रिया करणे या गोष्टी करतो, असा खुलासा केला आहे. मेंदु व हृदय यांचा अन्योन्यसंबंध आहे. या संबंधाचा नीटसा खुलासा करतां येत नसला तरी तो आहे ही गोष्ट खास. आयुर्वेदामध्यें चेतना किंवा आद्यप्रेरणा ही हृदयापासून उत्पन्न होते असें वर्णन आहे. सुश्रुतामध्येंः--

हृदयं चेतनास्थानमुक्तं सुश्रुत देहिनाम् ।


 हृदय हैं प्राण्याचें चेतनास्थान आहे, असें वर्णन केलें आहे. अव्याहतपणे चालणाऱ्या हृदयापासून मेंदूचे ठिकाणीं प्रेरणा उत्पन्न होते. हृदयाचे स्पंदन कमी, अव्यवस्थित होईल त्यामानाने शरीरांतील इंद्रिंयांच्या संवेदना व प्रेरणा कमी किंवा अव्यवस्थित होतात ही गोष्ट अनुभवाची आहे. व यावरून हृदय हेंच प्रेरणेचें उगमस्थान ठरते. यापासून उत्पन्न झालेली प्रेरणा प्रथम मेंदूकडे पोचती होते. व तेथून निघणाऱ्या आणि सर्व शरीरभर पसरणाऱ्या अनेक ज्ञानवाहिनींचे द्वारे