पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 तिचा सर्व शरीरभर पुरवठा होतो. हृदय आणि मेंदु यांचा हा अन्योन्य संबंध सूक्ष्म अशा वाहिनींचे साहाय्यानें जडलेला आहे. उरःस्थानांतील हृदय व मेंदु यांचा मध्यवर्ति प्रांतहि या वायूचे कार्यस्थानांत समाविष्ट होतो. यासाठीच प्राणवायूचे वर्णनांत ' उरः कंठचरः ' ( अ. हृ.) ऊर आणि कंठ यांमध्ये ज्याचा संचार आहे असा उल्लेख केला आहे.
 प्राणवायूचा स्थाननिर्देश करीत असतां आणखी एक शंका येण्यासारखी आहे; ती अशी की, ऊर व हृदय हीं स्थान अनुक्रमें उदान आणि व्यान या वायूचे भेदांची म्हणून सांगण्यांत आली आहेत. मग ही स्थाने पुन्हां प्राणवायूची कशी असावी ? ( उरःस्थानमुदानस्य, व्यानोहृदिस्थितः ) त्याचें उत्तर असे आहे कीं, प्राणवायूचे खरं कर्तृत्व मेंदू किंवा मस्तक यामध्ये असून त्याचा परिणाम काही अंशाचे दुय्यम दर्जाचा हृदय आणि ऊर त्याचप्रमाणें कंठ यांवरहि होतो. हृदयाचें स्पंदन, फुफ्फुसांचे संकोचविकास, त्यामुळे होणारा श्वासोच्छवास, यांचा मेंदूवर घडणारा परिणाम या सर्व क्रिया परस्परांशी एक प्रकारें मिश्र झालेल्या किंवा अन्योन्याश्रयी आहेत आणि यामुळेच यांतील कोणत्याहि क्रियेच्या प्रवर्तकाचा इतरांशी थोडाफार संबंध आल्याविना राहत नाहीं. तथापि स्थानी कार्यें घडविणाऱ्या वायूचा स्थानाश्रयी म्हणून मुखपत्रे निर्देश केला जातो.

 दुसरा उदानवायु. याचें स्थान ऊर हाणजे फुफ्फुसे असून त्याचा परिणाम कंठ, नासिका यांमध्ये ह्मणजे श्वासोच्छ्वासाचे साधनीभूत अवयवांवर व खालीं उदरांत नाभीपर्यंत होतो. फुफ्फुसांचे संकोचविकास ह्या वायूचें मुख्य कार्य. फुफ्फुसे हालतात याचे कारण त्यांत असलेला हा वायु होय. या वायूमुळे फुफ्फुसांत गति उत्पन्न होते व त्यामुळे श्वासोच्छवासाची क्रिया सुरू होते. फुफ्फुसांचे हालचालीमुळे जी गति उत्पन्न होते तिचा परिणाम कंठ आणि नासिका येथपर्यंत होणें हे उघड दिसणारेच आहे. पण या गतीनें छातींतील अवयव व उदराचा भागहि हालतो, हैं सुचविण्यासाठी या वायूचे संचारक्षेत्रांत नाभीचा समावेश केला आहे. या वायूची स्थाने व कार्ये सांगतांना:--

उरस्थानमुदानस्य नासानाभिगलांश्चरेत् ।
वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जायलवर्णस्मृतिक्रियः ॥ १॥( अ.हृ. )


  उदानवायूचे स्थान ऊर असून त्याचा नासिका, नाभि आणि कंठ यांमध्ये संचार असून, बोलणे, उत्साह, शक्ति, वर्ण आणि स्मृति हीं कार्यें हा वायू करतो. सर्वच शरीराची गति फुफ्फुसांच्या गतीपासून उत्पन्न होते. यामुळे उत्साह व प्रयत्न यांचे आद्यप्रवर्तकत्व या वायूकडे येते याचे क्रियांतील स्मृति किंवा स्मरण ही क्रिया कां व कशी होते याविषयीं खुलासा करता येणार नाहीं. या वायूचे क्रियांमध्ये विशे-