पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३
संवेदनात्मक वातस्थाने.

 षतः ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे कीं, उदानवायूनें फुफ्फुसांची गति सुरु झाली तरी श्वासोश्वासाची क्रिया मात्र प्राणवायूचे सहाय्याने होते. प्राण आणि उदान या वायूंच्या क्रिया ध्यानीं घेतां श्वासोच्छ्वासाचे कार्य या उभयवायूंचे सहाय्याने घडते, किंबहुना फुफ्फुसांमध्यें गति उत्पन्न झाली तरी देखील कंठ आणि नालिका यांमधील विशिष्ट ज्ञानवाहकांच्या सहाय्यानें हें कार्य घडते. हैं ह्या वर्णनांत स्पष्टपणे सुचविले आहे. आणि म्हणूनच उदान वायूचे क्रियांमध्ये श्वासोच्छवासाचा समावेश न करितां प्राणवायूचे क्रियांमध्ये केला आहे.

(ष्टीवनक्षवथूद्वारानिश्वासान्नप्रवेशकृत् । )

 तिसरा व्यानवायु याचें स्थान हृदय सांगितलें आहे. त्याचे वर्णन:-

व्यानो हृदि स्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः ॥
गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणादिकाः ॥ १ ॥
प्रायः सर्वाः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धाः शरीरिणाम्


  व्यान वायूचें स्थान हृदय असून हा वायु शरीरांत सर्वत्र संचार करणारा, महावेगवान् असून चालणे, उठणे, बसणे, निमेपोन्मेष इत्यादि शरीराच्या बहुतेक सर्व क्रिया या वायूनेच घडतात. ( अष्टांग हृदय )

 सर्व शरीरामध्ये हृदयाचे महत्व किती आहे, याचे वर्णन करण्याची अवश्यकताच नाहीं. हृदयामध्ये जी गति निसर्गानें ठेविलेली आहे तीमुळे त्याचें निरंतर स्पंदन चालते व या सर्व संदनापासून सर्व शरीरभर मुख्य अशा दोन तत्वांचा पुरवठा होतो, तीं तवें ह्मणजे रक्त आणि चैतन्य ह्रीं होत. या दोन वस्तूंशिवाय शरीर निरुपयोगी असते. ज्या वेळीं या दोन जीवनाधार तत्वांचा हृदयाकडून शरीराचे एकाद्या भागाला अथवा सर्व शरीराला पुरवठा कमी होईल. तेव्हां त्या त्या भागांत अनेक विकारांचा प्रादुर्भाव होतो. शरीराच्या कोणत्याहि भागांत ज्या अनेक क्रिया घडतात त्यांना मुख्य साधन रक्त- रसधातु - आणि चैतन्य हेंच आहे. व म्हणून हृदयामध्यें गति उत्पन्न करून त्यांचा शरीरभर पुरवठा करणारा जो व्यानवायु त्यावर सर्व शारीरिक क्रियांचे कर्तृत्व अवलंबून असल्याचे सांगितलें आहे. प्राण, उदान आणि व्यान ह्या वायूंच्या क्रिया अन्योन्यसंवर्धक आहेत हे नेहमीच ध्यानीं असावयास पाहिजे.
 चौथा समान वायु याचें स्थान पच्यमानाशय कोठा किंवा लहान आंतडी हैं होय :-

समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः ॥
अन्नं गृण्हाति पचति विवेचयति मुंचति ॥ १ ॥


  समानवायु हा कोठ्यांत जठराग्नीचे सन्निध असून तो सर्व कोठ्यात