पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५
ऐशीं वातविकार.

 उष्णता व गति उत्पन्न होते. व मग सर्व लहान मोठ्या विभागांत क्रिया चालू होतात, तसाच कांहींसा हा प्रकार आहे. मात्र कृत्रिम यंत्रांमध्ये ही गति देणारा कोणी तरि पाहिजे मग तो प्रत्यक्ष असो अथवा अप्रत्यक्ष असो. तशी शरीरयंत्राची स्थिति नाहीं. या यंत्रामध्ये निसर्गाच्या अलौकिक चातुर्याने स्वाभाविक संवेदना किंवा इच्छासामर्थ्याची योजना झालेली असून ती सर्व शरीरांत प्रथम गति उत्पन्न करते. या संवेदनेचा प्रथम संयोग वायूवर किंवा गतिशील विरलाणूंवर होतो. वायु सूक्ष्म आणि इच्छाशक्ति अतिसूक्ष्म. अतिसूक्ष्म संवेदनेचा स्थूल शरिरा वर परिणाम घडविण्याला वायूसारख्या सूक्ष्म मध्यस्थाची अवश्यकता सहजी पटण्यासारखी आहे. यापुढे वायूची आयुर्वेदांत वर्णन केलेली विकृतावस्थेतील कायें-लक्षणे कशी घडतात, याचा विचार करूं. चरकामध्ये एकंदर ऐशीं वातविकार-लक्षणे सांगितलीं आहेत; ती येणें प्रमाणः--

ऐशीं वातविकार
तत्रादौ वातविकाराननुव्याख्यास्यामः- तद्यथाः

" नखभेदश्च, विपादिका च, पादशूलश्च पादभ्रंशश्च, सुप्तपादता च वातखड्डताच, गुल्फग्रंथिश्च पिंडिकोद्वेष्टनं च गृधसी च, जानुभेदश्व, जानुविश्लेषश्च ऊरस्तंभश्च ऊरुसादश्च, पांगुल्यं च, गुदभ्रंशश्च, गुदार्तिश्च, वृपणोत्क्षेपश्च, शेफस्तंभश्च, वंक्षणानाहश्च श्रोणिभेदश्च, उदावर्तश्च, खंजत्वंच, कुत्वंच, वामनत्वं च त्रिकग्रहथ, पृष्ठग्रहश्च, पार्श्ववमर्दश्च, उदरोवेष्टश्च, हृन्मोहश्च, हृदावश्च, वक्षउद्भूर्षश्च, वक्षउपरोधश्च, बाहुशोपश्च, ग्रीवास्तंभश्च ,मन्यास्तंभश्च कंठोध्वंसश्च हनुताडश्च, ओष्ठभेदश्च, दंतभेदश्च, दंतशैथिल्यं च, मूकत्वं च वाक्संगश्च, कषायास्यताच, मुखशोषश्च, अरसज्ञताच, अगंधज्ञता च, घाणनाशश्च कर्णशूलश्च, अशब्दश्रवणं च, उच्चैःश्रुतिश्च, बाधियं च वर्त्मस्तंभश्च वर्त्मसंकोचश्च, तिमिरश्च, अक्षिशूलश्च, अक्षिव्युदासश्च भ्रूव्युदासश्च शंखभेदश्च, ललाटभेदश्च, शिरोरुक्च, केशभूमिस्फूटनं च अर्दितं च, एकांगरोगश्च, सर्वांगरोगश्च, पक्षवधश्च, आक्षेपकश्च, दंडकश्च श्रमश्च, भ्रमश्च, वेपथुश्च, जृंभा च, विषादश्च, अतिप्रलापश्च, ग्लानिश्च रौक्ष्यं च पारुष्यं च श्यावारुणावभासताच, अस्वप्नश्च, अनवस्थितत्वंच इत्यशीतिर्वातविकाराः ॥ ( चरकसंहिता. सूत्रस्थान अध्याय २०.) अनेक वात विकारांपैकी ठळक अशी हीं लक्षणें सांगितली आहेत. पैकी १ नखभेद ह्मणजे नखें फाटणें फुटणें हैं लक्षण नखांमध्ये रुक्षता आल्याने होणारें. २ विपदिका म्हणजे तळहात व तळपाय यांतील स्निग्धता कमी झाल्याने त्यांची त्वचा रुक्ष होऊन ती फाटते. ३ पादशूल-पायांना ठणका- लागणे,