पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
आयुर्वेदातील मूलतत्वें.


तळपायांना, स्नायुसंकोचनामुळे ठणका लागतो. ४ पादभ्रंश- पाऊल योग्य ठिकाणी न पडतां भलत्या ठिकाणीं पडणें, हा विचार पावलाचा नसून पायांचे-तंगडीचे स्नायूंचा आहे, ज्यावेळी ह्या स्नायूंमध्ये - अशक्तपणा - विकृति उत्पन्न होते त्यावेळीं पाऊल ताब्यांत राहात नाहीं. ५ सुप्तपादता पायांतील त्वचेमध्ये पुरेसें रक्ताभिसरण नसतां किंवा कोणत्या तरी कारणानें पायांत अशुद्ध रक्ताचा संचय झाला असतां स्पर्शनद्रियाचे त्या भागांतील कार्यात व्यत्यय येऊन हे लक्षण उद्भवते. ६ वातखुड्ड्ता म्हणजे पायाची - तळव्याची-त्वचा सडून जाणे. ज्याप्रमाणे थंडीचे दिवसांत शरीरावरील त्वचा रक्ताचे अभावीं कोरडी होऊन फाटते व निघून जाते त्याप्रमाणे पायांचे तळव्यांना रक्ताचा पुरवठा त्यांचे जाड कातडीत कमी झाला असतां ती कोरडी आणि निर्जीव कातडी सडूं लागते. व त्यामुळे लहान लहान अनक भोंकें दिसतात. (चाळणीप्रमाणें. ) पायांनी प्रवास करणारांमध्ये ही विकृति फार दिसून येते. चालून चालून चामडी राठ होते. व त्यामुळे तीत रक्त नीट पसरत नाहीं. ७ गुल्कग्रंथि घोट्यांना गांठीळ सूज येणें, कोणत्याहि ठिकाणी स्नायूंची सूज गांठीळ असते. व अनेक स्नायु जिथे एकत्र असतात तेथे ही अधिक संभवनीय. पायाचा घोटा हैं असें एक स्थान आहे. ८ पिंडिकोद्वेष्टनं पायांच्या पोटऱ्या वळणे, पोटऱ्यांचे मांसल भागांतील स्निग्धता - मेदस्वीभाग- कमी झाला ह्मणजे त्यांतील स्नायूंचे संकुचितपणामुळे एकप्रकारची ओढ लागते. ९ गृध्रसी तंगडीच्या स्नायूचा संकोच, १० जानुभेद - गुडध्याला फूट लागणे गुडध्यामध्ये त्या संधीचे सुव्यवस्थित संचारासाठी ज्या चिकट पदार्थाची -श्लेष्म्याची- योजना असते. त्यांत कमतरता झाली म्हणजे ह्या सांध्यांतील श्लेष्मधरा कला - श्लेष्मलत्वचा आकर्षण पावते. व हाडांचेहि घर्षण होतें. श्लेष्मलता कमी झाली कीं, स्वाभाविकपणेच आकुंचन- आकर्षण होते. आणि ठणका लागतो, ११ जानुविश्लेष गुडघ्याचा सांधा निखळणें वरील लक्षणाचीच ही एक अवस्था आहे. संधि हा आंतील चिकट श्लेष्मा आणि त्यावरील आच्छादक पेशी आणि स्नायु यांनीं झालेला आहे. त्यामुळे श्लेष्मा कमी झाला कीं, संधीमध्ये स्वाभाविकपणेच ढिलेपणा येतो. ज्यावेळी या संधींतील कफाची वाढ होते त्यावेळीहि संधीमध्यें ढिलेपणा येतो. परंतु त्यावेळीं ठणका असत नाहीं. १२ उरुस्तंभ हा विकार प्रसिद्ध आहे. मांड्यांतील स्नायूंमध्ये स्तंभ उत्पन्न झाल्यानें होणारा हा विकार आहे. या स्तंभामुळे मांडयामध्ये जडत्व येते. इतकें की, याचें वर्णन करतांना मांडया दुसन्याच्या असल्याप्रमाणे भासतात. ( परकीयाविव गुरुस्यातां. ) असे केले आहे. १३ ऊरुसाद - मांडया सुंद होणें. ऊरुस्तंभाची ही प्राथमिक अवस्था किंवा अल्प विकृतीचें