पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४

 अंतस्थ मनाचें जें खरें राज्य त्याशीं ऐक्यता नाहीं अशा अवांतर गोष्टींविषयीं आपलें बोलणें होतें. उदाहरणार्थ:- हवेचे फेरफार, पिकें, नुक्तीच प्रसिद्ध झालेली कादंबरी, शेजाऱ्यापाजा- यांचें दुःखणें, त्यांचीं व्यंगें इ०. वस्तुतः जी गोष्ट जास्त क्षुल्लक किंवा फार कमी महत्वाची तिच्याबद्दल मोठा वादविवाद चाल- लेला दिसतो; व ज्यांस बोलण्याची योग्यता अगदी कमी तेच जास्त वेळ बोलतांना दिसतात.
 संभाषण करणें ही कला आहे हें थोड्यांच लोकांस कळतें. कुटुंबांत ऐक्य पाहिजे असलें तर फक्त प्रेम व मन शुद्ध असून चालावयाचें नाहीं ; एकमेकांबद्दल कळवळा असला पाहिजे; व परस्परांच्या विचारांची अदलाबदल करण्याची युक्ति माहीत अ सली पाहिजे. जर लोकांपासून तुमची करमणूक होत नसली, तर त्यांची करमणूक तुह्मी करा.
 मनांत येतें तें आपण बोलून दाखवितों असा पुष्कळां गर्व असतो. व प्रत्येकानें सत्य बोलावें व सरळपणानें वागावें ह्यांत संशय नाहीं. पण, संभाषण करणें हैं इतर गोष्टींप्रमाणें आहे, त्यापासून करमणूक व्हावी असें वाटत असल्यास आपणांस फार श्रम घेतले पाहिजेत.

 घरांत सुख व्हावें ह्मणून प्रत्येकास कांहींनाकांहीं करितां ये- ईल. “ मनुष्यजातीस संपत्तीचें भांडार देऊन सुखी करण्याचें, त्यांना शक्ति देऊन भूषविण्याचें, अथवा त्यांचें आरोग्य राख- ण्याचें आमच्या हातीं नाहीं. पण इतरांचें समाधान करण्याची शक्ति देवाने सर्वांच्या ठायीं दिली आहे. फेडीची आशा न क- रितां, लोकांच्या बऱ्या बोलण्याची किंवा परलोकीं वाहवा करून घेण्याची अपेक्षा न करितां, शांतपणे प्रेमाचें काम करण्याची शक्ति सर्वांस दिली आहे'."


 १ हाना मूर.