पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५९

च्यायोगानें आपली सर्व सुखें दुप्पट होतात, व दुःखें निम्मे होतात'."
 स्त्री जातीचे मित्र चांगल्यारीतीनें निवडून काढणें हेंही ति- तक्याच महत्वाचें आहे. सालोमनच्या वेळेपासून पुष्कळ शहाण . माणसें स्त्रियांच्या मोहपाशानें फसली आहेत. “त्यांची मनें मोठीं पण सुंदर मूर्तिपूजक स्त्रियांनीं पाशांत गुंतून घेतल्यामुळें तीं दुष्ट मूर्तीपुढें नत झाली.” “मैत्री हा नरदेहाचा अलंकार” असें लिली ह्मणतो. मित्ररहित माणसांची कीव येते; कारण, मुख्यत्वें- करून तो आपल्याच अपराधांमुळे तसा रहातो.
 “ मनुष्यास माहीत नसतां त्याच्याशीं सहृदयता असणारें एक देखील माणूस ज्याला नाहीं, इतका कठोरपणा दैवाने कोणाशींहीं केला नाहीं. व इतका एकलकोंडा मनुष्यही जगांत नाहीं."
 केवल दुःखानें ह्मणतो त्याप्रमाणे, आपण एकलकोंडें असावें, व आपला कोणाशीं संसर्ग नसावा हे जरूरीचें नाहीं. तो ह्म- तो - "आपले जीवात्मे बैराग्याप्रमाणें आपापल्या सुखदुःखाच्या गुप्त चक्रांतच इतरांपासून निराळे भ्रमत असतात. सभोवारची वस्तुस्थिति अंतस्थ स्थितीप्रमाणें आपल्या डोळ्यांस उदासीन किंवा उल्लासित वाटते. व तिच्यावर आपल्या हृदयाची प्रत्येक नवी झांक मारते."
 तरी मर्जी असल्यास एकटें रहाण्यास मधून मधून अवकाश असावा हें चांगलें. कारण, आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांस आपण कांहीं वेळ सोडिलें नाहीं, तर त्यांवरचें आपलें प्रेम रहाणें कठीण पडेल.

 आपणांस लोकांवर रुसून बसण्यास कारणें आहेत, असें वा-


 १ डेनहम. २ मिल्टन . ३ मिल्टन .