पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

पाण्यांत टाकितात - हें आश्चर्यकारक नव्हे का? गेल्या पिढींत पुष्कळ मुलें शिकल्या सवरल्याशिवाय राहिलीं तरी आह्मांस चालत असे. आतां देखील, शिक्षण फार झालें असें ह्मणतांना कांहीं लोकांना आपण ऐकतों. परंतु सध्यांचें शिक्षण लोकांच्या आयुष्यक्रमास उपयोगी नाहीं हा बहुतेक उदाहरणांत त्यांच्या बोलण्याचा अर्थ असतो, व हेंच त्यांत तथ्य असतें. ज्यांना शि- क्षणामागें होणारा खर्च आवडत नाहीं असे कांहीं लोक अद्यापि आहेत. परंतु अज्ञानापासून अंतीं जास्त खर्च होतो हे त्यांना कळत नाहीं. आपल्या बहुतेक सर्व मुलांना सध्यां थोडें तरी शिक्षण मिळते. मात्र आपली शिक्षणपद्धति योग्य आहे किंवा नाहीं ह्याबद्दल दोन मतें असण्याचा संभव आहे. परंतु त्या वादांत ह्या ठिकाणी शिरूं इच्छित नाहीं. इतकें मात्र ह्मणतों कीं, आह्मी शाळेंतून नीतिशिक्षणाची अयोग्य हयगय चालविली आहे. ह्याचा एक परिणाम असा झाला आहे कीं, ईश्वराच्या दहा आज्ञा मोडल्या तर वाईट काम होतें, व केव्हां केव्हां त्यापासून इतरांस दुःख होतें, हें खरें आहे, तरी त्यापासून आपणांस ऐहिक सुख होतेंच व चांगली स्थिति येते. आपमतलबीपणा, कंजूसपणा, दारूबाजी, आळस इत्यादि ख्यालीखुशालीचे दुर्गुण अन्याय्य खरे व त्यापासून लोकांचा तोटा होतो, तरी स्वतःचा नफाच व्हावयाचा. “आपल्या स्वतःबद्दलचाच विचार केला तर आयुष्य चैनींत घालवावे अशी इच्छा माणसास साहजिक होते. आपल्या अंगीं चांगले गुण आणणें व सद्गुणी होणें हैं किती जरी चांगलें असलें, त्यांत किती जरी मोठेपण असले, तरी त्यांत अपायहीन अशा करमणुकीच्या गोष्टींस देखील फांटा द्यावा लागतो; आणि सर्व आयुष्याचा व्यापक विचार केला तर असलें