पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६३

व जरूर नसेल तेव्हां जवळ येणार नाहीं; अशी कल्पना मनांत आणूं नका. हें केवळ मनोराज्य; आनंदांत घालविलेल्या तारु- ण्यांतलीं हीं स्वप्नें'."
 जेरेमी टेलर ह्मणतो:- “पतीच्या कर्तव्यकर्मीस होमर गोड नायें देतो. तूं तिचा बाप, आई, भाऊ, सर्व कांहीं तूंच व तसें असण्यास चांगलें कारण आहे. नाहींतर लग्न करणें ह्मणजे पोर- केपण घेण्यासारखें होईल. कारण, जी आपली आई, आपला बाप, आपले भाऊबंद तुझ्यासाठीं सोडून देते, तिला ह्या सर्वांचें प्रेम व तुझें प्रेम तुझ्या ठिकाणीं सांपडलें पाहिजे; नाहींतर ती पोरक्याप्रमाणें दीन होईले. "
 ह्याबद्दल संशय असल्यास लग्न करूच नका. लग्नानंतरची स्थिति अतिशय आनंदाची अथवा अतिशय दुःखाची होते. लग्न करणें हें जबाबदारीचें काम आहे. नुस्त्या रूपाला भुलूं नये, अथवा त्याच्यावर फारसा विश्वास ठेवू नये. “लग्न करणें ह्मणजे नुस्तें तोंड पाहून हातांत हात घालणें नव्हे; विचाराने हृदयाची हृदयाशीं ऐक्यता करणें होय. "
 चांगली बायको फक्त व्यावहारिक बाबतींत उपयोगी पडते असें नव्हे, तर मानसिक बाबतींतही उपयोगी पडते. शेक्सपियर ह्मणतो:-- “ वाईट माणसांची एकाद्या बाईवर प्रीति जडली - णजे त्याच्या मनांत सहाजिक असणें शक्य असेल त्यापेक्षां जास्त उदात्तपणा येतो.” खलांच्या मनांत जर सत्कृत्यांविषयीं एवढी प्रेरणा होते, तर ज्यांचा स्वभाव मुळचाच उदात्त त्यांच्या मनांत किती होईल ?

 "कांहीं माणसें अशीं आहेत कीं, तीं ह्या जगाच्या पलीकडे


 १ सर एचू टेलर नोटस फ्रॉम लाईफ २ मॅरेज रिंग.