पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८१

मानुरूप जो वागतो, त्याला सृष्टींतील पदार्थ आपल्या बऱ्यासाठीं काम करीत आहेत असे आढळते. बाह्य सृष्टीशीं त्याचें बरें असतें, सूर्यनारायण जो आपल्या मस्तकावर प्रकाशतो, व धूलि- कण जे आपल्या पायांखालीं तुडविले जातात, ते त्याचे मदत- नीस व मित्र होतात. कारण ज्यानें सूर्य, धूलिकण व इतर पदार्थ निर्माण केले, व ज्यानें त्या पदार्थोना अगदीं बाहेर जातां येत नाहीं अशा रीतीनें नियमबद्ध करून ठेविलें

त्याच्या मानसाप्रमाणें व इच्छेप्रमाणें तो वागतो.”


 १ किंग्स्ले,
 १६