पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१९

पली धर्मबुद्धि काय आहे, ह्रीं शेवटीं फारशीं उपयोगी पडावयाचीं नाहीत; आपण काय करितों हे महत्वाचें आहे.”
 “पण ज्ञान कोठें सांपडणार? व तें समजण्याची जागा कोठली ? ज्ञानाची किंमत माणसास कळत नाहीं, सजीव प्राण्या- च्या राष्ट्रांत (पृथ्वीवर) तें सांपडत नाहीं, अनंत जें विश्व, तें माझ्याजवळ ज्ञान नाहीं असें उत्तर देतें, सागरही ते माझ्या ठायीं नाहीं असें सांगतो. सोनें देऊन तें मिळत नाहीं; किंवा रुप्याच्या भारंभार वजनाला तें मिळत नाहीं. xx मोतीं व पोंवळीं ह्यांची तर कथा काय? त्यांची किंमत माणकाच्या किंमती- पेक्षां जास्त आहेxxxxआतां ज्ञान कोणतें ह्मणाल तर ईश्वराची भीति; व वाईटापासून दूर रहाणें, ह्याचें नांव समजूते."
 सचोटीनें वागा व सत्य बोला. जीन पॉल रिचटर ह्मणतो “पृथ्वीवरील पहिलें पाप असत्य हे होय. व सुदैवेंकरून सैता- नानें तें ज्ञानाच्या फळाबद्दल सांगितलें. सचोटी हाच खरा उत्तम मार्ग."
 “खोटा तराजू असणें हें ईश्वराला खपत नाहीं. पण रोख चोख वजन त्याला आवडतें.”
 चॉसर ह्मणे – “माणसांना बाळगण्यास उत्तम वस्तु ह्मणजे सत्य होय.” फॉक्लंडविषयीं क्लॅरन्डन ह्मणतोः – "सत्य त्याला इतकें पूज्य होतें कीं, असत्य बोलणें व चोरी करणें ह्या दोन गोष्टी त्याला सारख्याच होत्या." "सत्याला सोडणें ह्मणजे, माणूस ईश्वराला तुच्छ मानतो, व नंतर माणसाला घाबरूं लागतो असें मानण्यास चांगला पुरावा होयँ.”
 आपण जर अन्याय केला असला तर आपणाला लाज वाटावी


१ रस्किन. २ जोब. ३ फ्रुटार्क.