पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२३


बऱ्याचा विचार करा ह्मणजे तुह्मी वाईट करणार नाहीं. "मरण, अंत्यशासन, स्वर्ग, नरक, ह्यांविषयीं जो वारंवार विचार करतो तो सुखानें मेला पाहिजे'." व त्याबद्दल बक्षिसही मोठें असतें.
 “माझ्या मुला, माझे नियम विसरू नकोस. पण तुझ्या हृदयांत माझ्या आज्ञा वागूं दे. ( रात्रंदिवस व सर्व आयुष्यभर ) त्याच्या योगानें तुझ्या सुखांत भर पडेले."
 हैं काम लांबणीवर टाकूं नका. तारुण्य ही सबब नको. मार्ग- रीट दी वॅलोआ हाणे- “आमच्या हाडांवर चिमुटभर मांस राहिलें नाहीं ह्मणजे आपण अगदीं सद्गुणी होऊं."
 तारुण्याच्या भरांत तुमच्या उत्पन्नकर्त्याची तुह्मांला आठवण होऊं द्या. आपल्या इच्छेप्रमाणें मरावें असें वाटत असल्यास योग्य रीतीनें वागलें पाहिजे. चांगल्या माणसास मृत्यूचें भय नाहीं. थर्वाल शेवटच्या दुखण्यांत, पुढील वाक्य सात भाषेंत लिहिण्यांत गुंतला होताः - "निद्रा ही मृत्यूची बहीण व ह्मणून निद्रारूपी मृत्यूंतून, व मृत्युमय निद्रेतून जो जागृत करणारा त्याच्यावर निजतेवेळी हवाला टाका. "
 सिसरो ह्मणतो- " जेव्हां सॉक्रेतीस त्याच्यावर आरोप आण- णाऱ्या लोकांपुढे उभा होता, तेव्हां देहांत शिक्षा झाली आहे अशा माणसाप्रमाणें तो दिसत नव्हता.तर स्वर्गास जाणाऱ्या माणसाप्रमाणे दिसत होता. "

 "जर आपले कर्तव्य शौर्यानें व उदारपणानें केलें तर तु- ह्यांला काय मिळेल ? तें करणें तुह्मांला मिळेल." तें कृत्य तुमचें होईल. योग्य तें केलें पाहिजे. तें लाभाच्या आशेनें व शिक्षेच्या भीतीनें करूं नका, परंतु जें चांगलें आहे त्याच्या आवडीनें तें


१ सर वाल्टर रेले. २ प्राव्हर्ब्स.