पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३०


मिळालें आहे, अशा मनाला सभोवारच्या पदार्थात सतत करमणु- कीच्या गोष्टी सांपडतीलच; ह्मणजे सृष्ट पदार्थात, कलाकौश- ल्याच्या जिन्नसांत, ऐतिहासिक गोष्टींत, कवींच्या कल्पना- शक्तींत, पुरातन काळच्या व अर्वाचीन काळच्या रीतिभातींत आणि आपल्या भावी स्थितींत इ०. त्या सर्वाचा तिटकारा येणें हैं शक्य आहे, व तें देखील त्यांचा हजारावा अंश संपण्या- पूर्वीच; परंतु हें केव्हां घडतें? जेव्हां पूर्वीपासून ह्या वस्तूं माणुसकीस योग्य व नैतिक असें कांहीं आहे ह्मणून चित्त वेधत नसलें, व फक्त जिज्ञासा तृप्त करण्याकरितां त्यांकडे लक्ष गेलें असलें तर होतें."
  आपण रहातों त्या जगांत अनेक फुलें, झाडेझुडपें, गवत, नद्या, सरोवरें, समुद्र, पर्वत व सूर्यप्रकाश इत्यादि वस्तु आहेत. सृष्टपदार्थ आनंदी माणसांस आनंदकारक दिसतात, व ज्यांना समाधान करून घ्यावयाचें असेल त्यांना समाधान देणारे आहेत.
 "सकाळ शांत होती, सूर्यप्रकाश पडला होता, आकाश निरभ्र होतें, हवेंत थोडें धुकें होतें, पण घमघमाट सुटला होता. व सर्वत्र इतकें कांहीं शांतिमय वाटत होतें कीं, जणूं काय वसंत- देवी मरणाधीन झालेल्या वर्षास शेवटचें आलिंगन देण्यास व हताश झालेल्या जगास चुंबन देऊन सौख्याच्या मनो- राज्यांत निमग्न करण्यास आली आहे."

परंतु सौंदर्याची योग्यता कळण्यास सौंदर्य काय हें कळलें पाहिजे. कुत्रे व हत्ती ह्यांच्या अकलेविषयीं आपण बरेंच ऐकतो. परंतु जगांतील उत्तम देखावा त्यांना सुखकारक वाटेल असें मानण्यास कारण नाहीं.


१ मिल. २ मारीस.