पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२


मला वाटतें. राजभोग जगाला स्पष्ट दिसतो; व ज्या गोष्टी फार मोलाच्या वाटतात त्या सुद्धां स्पष्टपणे दिसतात. पण राजा आपलीं संकटें मनांतल्या मनांत दडपून ठेवितो. व त्या ठि काणींच माणसाचें सुखदुःख रहातें. मला विचाराल तर मला अनुभवावरून पूर्ण माहीत आहे व मी खरेंच सांगतों कीं, मोठमोठ्या सुखांपैकीं राजांना अगदीं थोडें मिळतें, व मोठ- मोठ्या संकटांचा मोठा अंश मिळतो."
 सुखाच्या नानापरींचें वर्णन करणें किंवा चांगुलपणाची मन वेधणारी चालचर्या सांगणें हें आह्मांला मुळींच कळत नाहीं. मोठ्या चांगुलपणाबद्दल फार झालें तर इतकेंच ह्मणतां येतें कीं, अमक्याच्या अंगीं अवर्णनीय असा मोहकपणा आहे. उच्चतम सुखाबद्दल इतकेंच बोलतां येतें कीं, त्याचें वर्णन करितां येत नाहीं. "
 योग्य विचार केला तर डॅन्टे कवीसारखें आह्मांलाही ह्मणतां येईल-
 “जें माझ्या दृष्टीस पडलें तें आनंदीआनंदच होय. सर्व वस्तुमात्रांनीं एकदम हास्य करावें त्याप्रमाणें तो आनंद मला वाटला. तुलनेच्या पलीकडे गेलेला तो होता. तो शब्दां- न बोलून दाखवितां येत नव्हता. शांतता व प्रीति ह्यांनी भरलेलें तेथलें शाश्वतचें आयुष्य होतें. अपार संपत्ति व अमित सुख तेथें होतें."

 शहाणपणाच्या व फायदेशीर अशा नियमांनी सृष्टीतील पदार्थ बद्ध आहेत. सर्व वस्तूंची सांखळ जुळवून दिली आहे व त्यांच्या बऱ्यासाठी सृष्टीचा यत्न चालला असतो. आपणांस जर दुःख


१ बेकन.