पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४४


तून ज्या यातनांस अंत नाहीं अशा यातनेंत पडणें हैं किती कठीण आहे, ह्याचा जो मनांत वारंवार विचार करील तो जग मिळविण्यासाठी देखील एक पाप करणार नाहीं. "
 ज्ञानप्रकाश आणखी थोडा वेळ तुजजवळ आहे; तो आहे तोपर्यंत पुढे पाऊल टाक, नाहीं तर अज्ञानतम येईल. व जो अंधकारांत चालतो त्याला आपण कोठें जातों हें कळत नाहीं."
 “तर मग जो हीं माझीं वचनें ऐकितो, व तीं पाळित नाहीं त्याची, जो मूर्ख रेतींत आपलें घर उभारतो, त्या मूर्खीबरोबर तुलना करावी. कारण पाऊस पडतो, पूर येतो, वारा वाहतो, व तो ह्या घरावर आदळतो, आणि तें पड़तें."
 परंतु उलटपक्षीं, " जो हीं वचनें ऐकितो, व तीं पाळितो, त्याची तुलना खडकावर घर बांधणाऱ्या शहाण्या माणसाबरोबर मी करितों. पाऊस पडतो, पूर येतो, वारा वाहतो, व त्यावर आदळतो, व तें पडत नाहीं, कां कीं तें खडकावर बांधिलेलें असतें. "
 विशेषेकरून जो इतरांस व तशांत बालांस आड मागीनें नेतो त्याचा सत्यनाश होवो.
 गुन्हे घडणार नाहींत हैं अशक्य आहे. परंतु ज्यांच्या- मुळे गुन्हे घडतात त्यांचा सत्यानाश होवो. त्यानें अज्ञान बा- लांस कुमार्गी लावावें त्यापेक्षां त्यांच्या गळ्यांत दगड बांधून त्यांला समुद्रांत बुडवावें हें बेरें."

 "आपला आत्मा भ्रष्ट होऊन पृथ्वीचें राज्य मिळालें तर त्याचा काय उपयोग ? अथवा आपल्या आत्म्याचा मोबदला त्यानें काय द्यावा ?


१ सेंट जान, २ ल्यूक. ३ म्यॅथ्यू.