पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४


"ईश्वराने दिलेली शांतता, जी अतर्क्य आहे, ती तुमचें मन व बुद्धि ईश्वराच्या प्रीतीच्या ठिकाणीं व ज्ञानाच्या ठिकाणीं ठेवील" असें आपणांस खात्रीपूर्वक सांगितलें आहे; व ईश्व राचा आशीर्वाद तुमच्यावर येईल, व नेहमीं तुमच्या जवळ राहील.
 हीं अभिवचनें आपणा सर्वांस दिली आहेत. श्रीमंतांस, मोठ्यांस, शहाण्यांस, विद्वानांसच फक्त हीं दिलेलीं नाहींत, तर सर्वांस दिली आहेत. कारण, देव माणसांस समान मानितो.
 "लहान मुलांना माझ्या जवळ येऊ द्या, त्यांना नाहीं ह्मणू नका, कारण देवाचें राज्य तसेंच आहे."
 हे फायदे स्वतः होऊन आपण घालविले तर जातील.
 “मृत्यु, आयुष्य, देवदूत, सद्यवस्तु, पुढें येणाऱ्या गोष्टी, उच्चपद, खोल जागा, अथवा दुसरा कोणताही प्राणी, हे मला ईश्वराच्या भक्तीपासून विभक्त ठेवणार नाहीत; आमची भक्ती येशू ख्रीस्त जो आमचा धनी त्याच्या ठिकाणीं ठसली आहे.
 "ह्याच रीतीनें आयुष्य आनंदी, शांत व सुखकारक होईल. शुद्ध वर्तन ठेवा व योग्य गोष्टीची काळजी करा, कारण त्याचमुळे अंतीं माणसास शांतता मिळेल.
 आयुष्यग्रंथांत ज्यांचीं नांवें दाखल झालीं आहेत त्यांच्या- मध्ये अशाच रीतीनें तुह्मांस रहातां येईल.
 व अशाच रीतीनें संसारांत कोणत्याही ठिकाणीं तुह्मी असा व तुमची स्थिति कशीही असो, तुह्मांला सुखाची आशा आहे.
 ज्या ठिकाणी ईश्वराची दृष्टि असते अशीं ठिकाणें, शहाण्यांस विश्रांतीची ठिकाणे वाटतात.
 किंग्सलेच्या उदात्त उक्तीप्रमाणें, चांगले व्हा—
 "ज्यांना हुशार ह्मणवून घेण्याची इच्छा असेल, त्यांना मो-