पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

मत कदाचित् चुकलें असेल, व तुमच्याबद्दल त्याचें मत तसेंच होईल; आणि तें कांहीं वावगे नाहीं.
 बर्क एकदां असें ह्मणाला कीं, मी सर्व राष्ट्राला वाईट हाणणार नाहीं. नियमित वर्गाला किंवा नियमित धंद्याच्या लोकांना दूषण देणें अन्याय्य व मूर्खपणाचें आहे. व्यक्तिमात्र असल दूषणें विस- रतात व त्याबद्दल क्षमाही करितात; परंतु समाज तसें करीत नाहीं. व्यक्तिमात्र नुकसान केल्याबद्दल सहज क्षमा करितात; तशी अपमान केल्याबद्दल करीत नाहींत. मला मान खालीं घाला. वयास लाविली ही गोष्ट व्यक्तिमात्राच्या मनाला टोचत असते. लोकांना चिडवून किंवा त्यांची थट्टा करून तुह्मांला आपलें काम करून घेतां येणार नाहीं. गयेथी “एकरमनबरोबरचें संभाषण " नांवाच्या पुस्तकांत इंग्रज लोकांची प्रशंसा करितो. ह्या लोकांचें समाजांतील संमेलन व वर्तन इतकें उजू व दमदार असतें कीं, हे लोक जेथें जातील तेथें राजे होतील, आणि हें जग त्यांचेंच आहे असें एकाद्यास वाटतें. एकरमननें उत्तर केलें - खराखर त- रुण इंग्रज लोक तरुण जर्मन लोकांपेक्षां हुशारीनें, शिक्षणानें, किंवा मनानें मोठे नसतात. गयेथी ह्मणाला - हा खरा मुद्दा नव्हे. त्यांचें मोठेपण असल्या गोष्टींत नाहीं; त्यांच्या जन्माच्या मानानें किंवा संपत्तीनें ते मोठे नाहीत; त्यांचे मोठेपण वाजवी रीतीनें पाहिलें असतां यांतच आहे-सृष्टीनें त्यांना जसें बनविलें तसें राहण्याचें त्यांच्या अंगीं धैर्य आहे. तीं माणसें अर्धवट नाहींत ; पूर्णतेस आलेली आहेत. इंग्रज लोक कधीं कधीं अगदीं मूर्खपणानेंही वागतात हें मला मनापासून कबूल आहे; पण तसें वागण्यासही धैर्य लागतें, व त्याचें तेज पडतें.
 कामाकाजांत व देवघेवीचीं बोलणीं चाललीं असतां अ- धीर होऊं नका. तुह्मी प्रथम आमची गोष्ट ऐका, मग हवी तर