पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

 पुष्कळ मोठे, उत्तमप्रतीचे व सुखी झालेले लोक गरिबींत होते. वर्डस्वर्थ व त्याची बहीण हीं बरीच वर्षेपर्यंत आठवडा तीस शिलिंगांवर काढीत असत. आणि मला वाटतें त्यांचा हाच सर्वात सुखाचा वेळ होय. जरी श्रीमंत होण्याचें तुमच्या नशिबीं नसलं, तरी सहवासामुळें व आवडीमुळे एकादी साधी जागा, एकादें लहानसें झोंपडें, एकादें सुखभावाचें माणूस, हीं सर्व जगाच्या किंमतीचीं तुह्मांस वाटू लागतील. महंमद ह्मणे कीं, “ईश्वर पैगंबर करण्यास माणसें गरीब धनगरांतून निवडून का- ढितो." हें बोलणें जरी आपणांस सर्वस्वीं कबूल नाहीं, तरी ह्या जगांत किती मोठे लोक गरीब होते हें पाहिलें ह्मणजे खरोख- रीच आश्चर्य वाटतें. पैशामुळे काय हवें तें होतें अशी अति- शयोक्ति करणें साधारणतः चुकीचें आहे.
 पोटापुरतें अन्न मिळण्यास दौलत हवी काय ?
 श्रीमंत मनुष्याला जर निरोगी रहाणें असेल, तर त्यानें गरी- ब लोकांसारखें अन्न खाल्लें पाहिजे. चहा, कॉफी, लोणी, रोटी, एकाददुसरें अंडें, एकाददुसरा हेरिंग मासा, आणि थोडासा मध ह्यांशिवाय सकाळच्या न्याहरीला आणखी दुसरें काय हवें ? रोटी, चक्का आणि बीर दारू ह्यांशिवाय दोनग्रहरच्या न्याहरीस काय पाहिजे ? साधें जेवण तें पण चांगल्या रीतीनें शिजविलेलें असलें ह्मणजे त्यापासून लॉर्ड मेयरनें राजवाड्यांत दिलेल्या मेजवानीपासून होणारा आनंद होतो. खाण्यास पथ्यकारक उत्तम वस्तूंस त्यांच्या हंगामाच्या वेळीं थोडीच किंमत पडते. हंगाम गेला ह्मणजे त्यांस रुचि कमी असते. अंडें बहुतेक मि- टान्नासारखेंच आहे, व केव्हां केव्हां तर तें त्याच्याहीपेक्षां जास्त रुचकर लागतें.