पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ६.
राष्ट्रशिक्षण.

 ज्या काळाचा इतिहास उपलब्ध आहे अशा अगदी प्राचीन काळापासून सर्व शहाणीं माणसें शिक्षणाचें महत्व सांगत आलीं आहेत. हितोपदेशांत सांगितलें आहे- “सर्व द्रव्यांत ज्ञान हैं फार मौल्यवान् द्रव्य होय. कारण, तें चोरलें जात नाहीं, देतां येत नाहीं, अथवा संपवून टाकितां येत नाहीं.” प्लेतो ह्मणतो, " सज्जन माणसास ज्या चांगल्या चांगल्या वस्तू मिळण्याजोग्या आहेत त्यांत ज्ञान हें श्रेष्ठ होय."
 मॉन्टेगनें टोकळ प्रमाणानें सांगून दिले आहे - "अज्ञान पा- पाचें मूळ होय." फुलरनें झटलें आहे- “सर्व दानांत मोठें दान ह्मणजे विद्यादान.".
 तारतम्यदृष्टीने पाहिलें असतां अज्ञानांत घालविलेल्या आ युष्यांत औदासीन्य असतेंच असतें. उपजीविकेचें साधन ह्म- णून नव्हे, तर देहसार्थक्याचें साधन ह्मणून ज्ञान माणसास हवें असें ह्मटलें आहे तें योग्य होय.
 “ज्ञान मिळविणेंच मला सर्वात जरूरीचें वाटे." असें पी- ताक ह्मणे; व शेक्सपीयर देखील लार्ड सेच्या तोंडून जे वद - वितो ते विचार कदाचित् स्वतःचेच असतील. अज्ञान ईश्वराचा शाप होय; ज्ञान स्वर्गास उडून जाण्याचे पंख होत.
 सॉलोमन एका सुंदर कवितेंत असें ह्मणतो- ज्या माणसाला ज्ञान होतें तो सुखी; व ज्याला समज आहे तोही सुखी. ज्ञा- नाचा व्यापार सोन्यारुप्याच्या व्यापारापेक्षां श्रेष्ठ. त्यांत होणारा


१ फुलर्स वर्दीज.