पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यूनगंड घालवावा :

 एवढे निश्चित की आदिवासी विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कधीच कमी पडणार नाहीत. कारण त्यांच्यात पराक्रम, निष्ठा, धाडस, जिद्द आहे. हा विद्यार्थी. अतोनात कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. त्याचे हे गुण जागविण्याची आज खरी गरज आहे. त्यासाठी योजना राबविणाऱ्यांनी व सर्वांनी त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांचा हा विश्वास कमावणे फार अवघड आहे. आतापर्यंत त्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नये अशा भयानक एकाकी जीवनाला तोंड दिले आहे. त्याच्या झालेल्या उपेक्षेमुळेच त्यांना कार्यकर्त्यांच्या हेतूविषयी शंका वाटते. आदिवासी विद्यार्थ्यांचा विश्वास कमावणे अवघड असले तरी व्रती बनून आदिवासी वेळप्रसंगी किंमत देऊनही तो आता आपल्याला संपादन करणे भाग आहे.

 आपल्या मनातील आदरभाव उघङ बोलून दाखविणे त्याच्या स्वभावात नसले तरी काळजात 'तो जपून ठेवतो. अंतकरण हेलावून टाकणारी आदिवासी विद्यार्थ्यांची आज स्थिती आहे. अनवाणी पायाने डोंगरातील पाऊलवाटा तुडवीत रानोमाळ भटकणारे हे विद्यार्थी थकल्या भागल्या चेहऱ्याने आणि शरीराने कसेबसे शाळा महाविद्यालयात येऊन पोहोचतात. तेथेही पुन्हा त्यांना कोणी पाठीराखा नसतो. “विचारु की नको" या संभ्रमात बराच काळ घालविल्यावर नशीब असेल तरच उशीरा का होईना, पण शिक्षणाला सुरुवात होते आणि वेळ व वर्षे पुरेशा मार्गदर्शनाअभावी त्यांची वाया जातात आणि याची फारशी दखल कोणी घेत नाही.

 विखुरलेल्या पाड्यापाडयातील, पुन्हा पाड्यापाड्यातही अंतर राखून पुरेशा न पिकणाच्या शेतीच्या लोभापायी ग्रामीण वातावरणात गुरफटलेला हा विद्यार्थी शहरात कॉलेजात मनोमनी फारसा रमत नाही. तो शरीराने शहर वस्तीत येतो तरी त्याचे मन पाड्यांवरच. कारण तेथे त्याचा समानधर्मी कळप असतो. यातून सुटका नाही, जमिनीबरोबरच तिला कसणारी आदिवासी माणसंही अशी भाजली जातात. पाणी पुरवठा, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण या पासून दूर राहतात. ही धावपळ आणि अवहेलना थांबविण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या

१११

१११