पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे आहे. नव्या वैज्ञानिक संस्कृतीशी त्याचा उचित मेळ आपल्याला घालता आला पाहिजे.

. ब. रा. स्व. संघ परिवार आदिवासींना वनवासी म्हणतो, म्हणून त्या शब्दप्रयोगाला विरोध करणे गैर आहे. त्याचा नीट अर्थ लावला पाहिजे. अनेक प्रकारे विचार केला असता वनवासी हा प्रयोग उचित वाटतो. म्हणून आदिवासी शब्दा ऐवजी वनवासी संज्ञा योजावी.

या संदर्भात डॉ. ल. नी. चाफेकर यांचे विवेचन :
 भारतीय राज्यघटना १९५० साली तयार झाली. त्यातील १६ वा भाग हा सवलतींचा असून त्यात प्रारंभी ३३० व्या कलमात सवलतदारांचे वर्ग दिलेले आहेत. त्यात अनुसूचित जमातींचा समावेश आहे. राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष ही यादी जाहीर करतात. लोकसभेला हा समाविष्ट करण्याचा व जाती वगळण्याचा अधिकार आहे. वर्गीकृत (शेड्युल्ड) जाती म्हणजे पूर्वास्पृश्य, विमुक्त जाती म्हणजे पूर्वीच्या गुन्हेगार, भटक्या जाती म्हणजे गावोगाव भटकणाऱ्या (कुडमेडे जोशी, गारूडी, डोंबारी, वैदू इत्यादी) वर्गीकृत अथवा अनुसूचित जमातींना-रानटी-डोंगरी टोळ्या, आदिवासी, वनवासी, वनजाती, वन्य जमाती, गिरिजन, भूमिजन, भूमिवासी, आरण्यक इत्यादी नावांनी संबोधिले जाते. (आदिवासी-आदिम जातीजनजाती हे शब्द उत्तरेत रूढ आहेत)
१. आदिवासी शब्दाचे जनक आचार्य भिसे आहेत. (गिरिजनांची समस्या) डॉ. . ल. ना. चाफेकर (पान नं. २) 'अॅबओरिजनल या इंग्रजी शब्दाचा मराठी . अवतार' आदिवासी शब्द आहे. हा शब्द अर्थहीन आहे. आपल्या स्थानी मूळचा नाही असे सांगून या शब्द योजनेचा ते कडक निषेध करतात. मूळापासून म्हणजे ? पृथ्वीची उत्पत्ती की माकडाचा मानव झाला तेव्हापासून ? म्हणून ... ही शब्द योजना हास्यास्पद आहे.
२. 'आदिवासी' शब्द कालवाचक आहे. जमातीनिदर्शक नाही. यामुळे वेगळेपणा, दुरावा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून डॉ. आंबेडकर, ओरिसाचे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांनी या शब्दप्रयोगास विरोध केला.