पान:आरोग्यविज्ञान.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ फुप्फुसें व श्वासक्रिया. छातीमध्यें रक्ताशयाच्या दोन बाजूंस दोन स्पंजांसारख्या ज्या मोठ्या पिशव्या आहेत त्यांस फुप्फुसें म्हणतात. रक्ताशयांतून शुद्ध रक्त एका मोठ्या नळीनें बाहेर पडतें, व झाडासारख्या त्या नळीला फुटलेल्या बारीक फांद्या असतात, त्यांमधून सर्व शरीर- भर पसरतें. अशाच रीतीनें, आपण श्वास घेतों तेव्हां, हवा श्वासनलिकेंत जाते, त्या नलिकेला दोन फांद्या फुटून एकेक एकेका फुप्फुसाला मिळते. प्रत्येक फांदीला पुन्हा बारीक फांद्या फुटतात. ह्यांतून पुढे गेल्यावर शेवटीं आपण आंत घेतलेली हवा लहान लहान कप्यांत शिरते. ह्या कप्यांच्या बाजूच्या पातळ पडद्यांत केंसासारख्या बारीक नळ्यांचें दाट जाळें असतें. ह्या नळ्यांत रक्ताशयांतून अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरितां येतें. अशा रीतीनें अशुद्ध रक्त व स्वच्छ हवा यांचा संपर्क झाला ह्मणजे मधल्या पातळ पडद्यांतूनच अदलाबदल सुरू होते. रक्तांतील दूषित वायु वगैरे कप्यांत शिरतात व त्यांच्या जागीं ऑक्सिजनचा रक्ताला पुरवठा होतो व हें ऑक्सिजनमिश्रित शुद्ध रक्त रक्ताशयांत परत जातें. आपण श्वास सोडतों त्या वेळीं, हवा आंत येते त्याच मार्गानें, दूषित वायु बाहेर पडून जातात. दूषित रक्त शरीराच्या सर्व भागांतून रक्ताशयाकडे परत येत असतां त्यांतील कांहीं घाण मूत्राशयही शोषून घेतो व मूत्रद्वारा बाहेर पाठवितो. आपण एका मिनिटांत पंधरा वीस वेळां श्वास घेतों व सोडतों हें ध्यानांत आणलें ह्मणजे वरील सर्व व्यापार फारच झटपट चालतो असें दिसून येईल. आपला रक्ताशय ह्मणजे एक भाता आहे. मनुष्य जन्मल्या - पासून मरेपर्यंत, दर मिनिटास सत्तरपासून नव्वद वेळ प्रमाणें,