पान:आरोग्यविज्ञान.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ पुढील तीन गोष्टींकडे लक्ष्य दिलें पाहिजेः (१) शरीरास लाग- णारी सर्व द्रव्यें रक्तांत मिळावीं ह्मणून अन्नाची निवड चांगली केली पाहिजे. (२) अन्न चांगले शिजविलें पाहिजे म्हणजे त्याचें पचन लवकर व चांगलें होतें. (३) अन्न चांगलें चावून व चर्वण करून खाल्लें पाहिजे म्हणजे त्यांत लाळ मिसळते व पचनक्रियेस तोंडांतच प्रारंभ होतो. आपल्या दांतांपैकीं कांहींचें काम अन्नाचे तुकडे करण्याचें 9 असतें व कांहींचें तुकडे बारीक कर- ण्याचें असतें. ह्या दांतांचा नीट उपयोग केला ह्मणजे अन्नाचें पीठ होतें, व त्याच वेळीं पचनास जरूर अशी लाळ त्यांत मिसळून तें ओलें होतें. नंतर घशावाटे तें आमाशयांत उतरतें. तेथें जाठररस त्यांत येऊन मिळण्याची व्यवस्था केलेली असते, व तेथील स्नायूंच्या चलनानें अन्न व जाठररस यांचा एकजीव होतो. तेथून अन्न आंतड्यांत उतरतें. आंतडें म्हणजे एक पंधरा वीस फूट लांबीची, म्हणजे आपल्या शरीराच्या जवळ जवळ तिप्पट लांबीची, अति लव- पचनेंद्रियेंः आमाशय व आंतडें चीक नळी आहे. ह्या नळीच्या वेटो- १ आमाशय. २ आंतडें.