पान:आरोग्यविज्ञान.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ अर्थात् रक्तांतील पाण्याचें प्रमाण कमी झालें कीं रक्तप्रसार नीट होत नाहीं. हें पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचें वर्तमान आपणास तहानेच्या द्वारा समजतें. तेव्हां पाणी पिण्यासंबंधीं हयगय करणें चांगलें नाहीं. जेवतांना तहान लागली तरी पाणी प्यावयाचें नाहीं अशा तन्हेचे नियम करूं नये. मात्र एकाच वेळीं फार पाणी पिऊं नये, त्यानें पचनक्रियेस व्यत्यय येतो. अनशेपोटीं व व्यायामानंतर नुसतें पाणी पिऊ नये, कारण तें नळांत शिरतें, नळ फुगतात व पोट दुखूं लागतें. घरांत एक एक दोन दोन दिवस पाणी सांठवून ठेवणें व त्याचा पिण्या- कडे उपयोग करणें अनिष्ट होय. पाणी ठेवण्याच्या भांड्यांची स्वच्छता बाहेरच्यापेक्षां आंतून आधीं पाहिजे. पोटांत पाणी कमी गेल्यानें कांहीं लोकांना अवष्टंभ झालेला आढळून येतो. वेळीं घोट दोन घोट प्रमाणें दर पंधरा मिनिटांनीं पाणी पिऊन एक दोन फुलपात्रे पाणी नेहमींपेक्षां पोटांत जास्त जाऊं दिलें तर अवष्टंभ मोडतो असें अनुभवास आलेले आहे. पटकी वगैरे कांहीं रोगांच्या जंतूंचा शिरकाव पाण्यांतून आपल्या शरीरांत होतो. तेव्हां पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेविषयीं काळजी घेणें जरूर आहे. शहरांतून ही काळजी घेण्याचें काम म्युनिसिपालिट्यांकडे असतें. पण कांहीं लोक, ह्या बाबतींत फार पुढे जाऊन, तापविल्याशिवाय पाणीच पीत नाहींत. पण ताप- .विण्यानें पाणी निकस होतें व त्यांतील अपायकारक वायूंबरोबरच आरोग्यकारक वायुही उडून जातात. तेव्हां, एखाद्या ठिकाणचें पाणी तापविणें जरूरच असेल, तर तापविल्यानंतर तें बराच वेळ