पान:आरोग्यविज्ञान.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ कारण ते मळले तर लगेच ध्यानांत येतात. स्वच्छता लोकांना दिसण्याकरितां नव्हे तर स्वतःच्या आरोग्याकरितां करावयाची असते. आपल्या हवेला गरम कपड्याची फारशी जरूर नाहीं. गरम कपड्याचा दोष असा असतो कीं त्यांत रोगजंतु लवकर प्रसार पावतात. विशेषतः गरम कपडा त्वचेलगत वापरण्यानें त्वचा अगदी नाजूक होते. कपडे फार जड असूं नयेत व घट्टही असूं नयेत. असो. तर शारीरिक स्वच्छता हा आरोग्याचा तिसरा नियम होय. व्यायाम, आंघोळ ह्यांप्रमाणेंच शरीराला विश्रांति व झोंप ह्यांची आवश्यकता असते. ह्यांचें काम शरीर व मन ह्यांचे श्रम हरण करून त्यांना ताजीतवानी करणें हें असतें. मुलांना नऊ- दहा तास झोप लागते, जाणत्या माणसांना सहापासून आठ तास- पर्यंत लागते. निजण्याच्या व उठण्याच्या वेळा अगदीं ठरवून ठेविलेल्या असाव्यात, म्हणजे झोंप गाढ येते व हितावह होते. मध्यरात्रीपूर्वीची एक तास झोंप मध्यरात्रीनंतरच्या दोन तास झोंपे- बरोबर असते. चांगली झोप लागून, चिलटें, ढेंकूण वगैरे आक- स्मिक कारणांमुळे नव्हे, तर सहजगत्या, आपण जागे झालों, म्हणजे पुरेशी झोंप झाली असें समजावें. नंतर अर्धवट झोपेंत लोळत राहण्यानें आळस मात्र वाढतो, फायदा कांहीं नाहीं. सूर्योदय होतो आहे तो उठून, मलशुद्धि, मुखमार्जन होऊन आंघोळ झालेली असावी, असा नियम ठेवावा. बिछान्याचे कपडे स्वच्छ राखावे. दुपारी झोंप घेणें अगदीं वाईट, तिनें आळस येतो व वेळाचा दुरुपयोग होतो. कोणत्या तरी कुशीवर निजावें, उताणें अगर