पान:आरोग्यविज्ञान.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० चहासंबंधीं विशेष ध्यानांत ठेविलें पाहिजे तें हें कीं चहा हें अन्न नव्हे. जेवावयास उशीर आहे ह्मणून चहा पिऊं नये. उपाशी पोटीं चहा पिऊं नये. चहा हें एक थोडेंसें उत्तेजक असें मजेचें पेय आहे. कांहीं खाल्लें ह्मणजे पाणी पिण्याऐवजीं, थकवा वाटत असेल तेव्हां, हें उत्तेजक पेय घेतल्यानें थोडी हुशारी वाटते. चहा अति घेतल्यानें भूक मंद होते. दिवसांत केव्हांही कोणा- पाजण्याची वाईट वहिवाट कडे गेलें तर आदरातिथ्य ह्मणून चहा हल्ली पडत चालली आहे ती लवकर नाहींशी होईल तितकें बरें. चहाचीं नेहमीं पानें वापरावीत. चहाचीं पानें पाण्यांत उकळलीं जातां कामा नयेत. तीं खालीं बसल्याबरोबर चहा गाळावा. पानें उकळलीं गेल्यानें अथवा पाण्यांत फार वेळ राहिल्याने चहांत अपायकारक द्रव्यें उत्पन्न होत असतात. दुधासंबंधीं कंजूषपणा करूं नये. जेवल्यानंतर सुपारी अगर विडा खाल्यानें तोंड साफ होतें. विड्यांत कांहीं उपयुक्त द्रव्येंही असतात. पण ह्या पदार्थांचा फार उपयोग केल्यानें तोंडाची चव अगदीं जाते व दांत किडतात. शिवाय हे पदार्थ उत्तेजक आहेत. कामकरी लोक दमल्यावर हुशारी आणण्याकरितां ह्यांचा उपयोग करितात हें पाहण्यांत येतें. विद्यार्थ्यांनीं उत्तेजक पदार्थ अगदी वर्ज्य करावे ह्मणजे चित्तशुद्धि राखण्यास मदत होते. तंबाखु खाणें अगर ओढणें, अफु, भांग, गांजा यांचा उपयोग करणें, दारू पिणें हे निःसंशय एकापेक्षां एक अधिक अपायकारक दुर्गुण आहेत. हे सर्व पदार्थ अतिशय उत्तेजक आहेत. उत्तेजक पदार्थ घेतल्याबरोबर थोडीशी हुशारी वाटते, पण ती खरी