पान:आरोग्यविज्ञान.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ नव्हे तर नकली हुशारी असते; ती संपल्याबरोबर अधिक खिन्नता मात्र उत्पन्न होते. सर्व दिवस खटारा ओढून दमलेल्या बैलाला चार कोरडे लगावले तर तो थोडी हिंमत दाखवून खटारा ओढतो, पण त्यामुळे त्याची शक्ति वाढत नाहीं तर उलट कमी मात्र होते. सर्व उत्तेजक पदार्थांची कमी अधिक प्रमाणानें ही अशीच गोष्ट आहे. वास्तविक शरीराला आपले काम करण्यास उत्तेजक पदार्थांची जरूरच लागतां कामा नये, व लागली तर उत्तेजक पदार्थांनीं नकली हिंमत आणणें हा उपाय टिकाऊ नव्हे. शरीरां- तील जोम खरोखर वाढविणें हाच त्याला उपाय आहे. वार्ध- क्यामुळे ज्यांच्या शरीरांतील जोम कमी झाला त्यांना एखाद्या साध्या उत्तेजक पदार्थाची जरूर भासली तर क्षम्य आहे; पण ज्यांच्या शरीराची इमारत नुकती कोठें बांधली जात आहे त्या तरुणांनीं, हें बांधकाम भक्कम करण्याकडे लक्ष देण्याऐवजी, असल्या फंदांत मोहानें पडणें म्हणजे आपल्या जन्माचें मातेरें करून घेणें होय. विडी ओढण्याच्या संवईनें झोंप नाहींशी होते, ज्ञानतंतूंना ग्लानि येते, डोकें फिरतें, श्वासनलिका बिघडते, रक्ताशय कम- कुवत होतो, भूक मंद होते, डोळे बिघडतात; दारूनें तर शरी- रांतील कोणच्या भागाला इजा होत नाहीं असें नाहींच, शिवाय अब्रू जाते, व कर्ता पुरुष ह्या व्यसनांत सांपडल्यास कुटुंबेंच्या कुटुंबें भिकेस लागतात हें क्षणभरहि विसरून कसें बरें चालेल? वरील गोष्टी ध्यानांत ठेवून त्याचप्रमाणें वागलें ह्मणजे शरीरांत रोगाची उत्पत्ति होणार नाहीं. पण कांहीं रोग संसर्गानें होत