पान:आरोग्यविज्ञान.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ असतात. वर आंघोळीसंबंधीं लिहितांना खरूजनायट्यांचें उदा- हरण घेतलें, तसेच दुसरेही पुष्कळ रोग आहेत. ह्या रोगांचे जंतु अतिसूक्ष्म असतात व संसर्गानें आपल्याला नकळत ते शरीरांत प्रवेश करितात. हें खरें कीं शरीर निरोगी व जोमदार असलें ह्मणजे हे जंतु शरीरांत शिरले तरी तेथें त्यांचा पगडा बसत नाहीं, तर ते उलट नाश पावतात. तथापि ह्या बाबतींत जपलें पाहिजे. रोगी मनुष्यानें वापरलेले कपडे, भांडीं व सर्व जिन्नस स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय वापरू नयेत. रोग्याच्या मलमूत्रांतून व कफांतून, इतकेंच काय, पण श्वासांतून सुद्धां रोगजंतु हवेंत पसरतात. तेव्हां पिकदाणीत वगैरे कॅर्बोलिक अॅसि- डाचा मुबलक उपयोग करावा, ह्मणजे रोगजंतूंचा नाश होतो. ह्याच कारणाकरितां, वाटेल तेथे थुंकण्याची निष्काळजीपणाची पद्धति अगदीं अपायकारक आहे. रोगजंतूंचा नाश सूर्यकिरणांनी फार चांगला होतो असें अनुभवास आलें आहे. तेव्हां घरांत सूर्यप्रकाश व स्वच्छ हवा मुबलक येईल असें करावें. थोडक्यांत सांगावयाचें ह्मणजे, ह्या सगळ्याचे मर्म अंतर्बाह्य स्वच्छता, शुचिर्भू- तपणा, ह्या एका शब्दांत आहे. शरीरांत ठिकठिकाणी पहारेकरी ठेविलेले आहेत. त्यांचा आपण उपयोग करून घ्यावा. हवा वाईट असली तर नाकावरचा पहारेकरी आपल्याला इशारा देतो. अन्न कच्चें असलें, अगर फळ अति पिकून नासलेलें असले, तर जिभेवरचा पहारेकरी आपल्याला जागें करितो. कपड्यावर धूळ व घामाचें पुट बसलें कीं डोळ्याला कसेंचसें वाटतें. हे पहारे- करी फार इमानी आहेत; मात्र त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष्य