पान:आरोग्यविज्ञान.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ वाढ अशी झपाट्याने होते कीं, ते तत्काळ मनुष्याचे प्राण हरण करितात. सकस व जोमदार रक्तांत त्यांना थारा मिळत नाहीं, ते नाश पावतात. तेव्हां वरील रोगांसंबंधीं सामान्य उपाय ह्मटला ह्मणजे शरीर निरोगी व जोमदार राखणें, व रोगजंतूंचा त्यांत प्रवेश न होईल अशी शक्य ती खबरदारी घेणें. आतां प्रत्येक रोगाविषयी थोडा निरनिराळा विचार करूं. 00:00- हिंवताप. हिंवतापाकडे आपण बहुशः फारसें लक्ष्य देत नाहीं, पण आपल्या देशांत प्लेगपेक्षां हिंवतापानेंच दरवर्षी माणसें जास्त मरतात. हिंबतापाचा प्रसार इकडे सार्वत्रिक आहे, व त्याचा मुक्काम होतो तेथें बहुतेक वाराही महिने असतो. हिवतापाच्या सूक्ष्म जंतूंचा प्रवेश डांस चावला ह्मणजे आपल्या रक्तांत होतो. हिंबता प झालेल्या मनुष्याला डांस चावला ह्मणजे जंतूंचा डांसाच्या शरीरांत प्रवेश होतो, व तेथें त्यांची वाढ होऊन तो डांस नंतर ज्याला ज्याला चावेल त्याच्या त्याच्या रक्तांत त्यांतील कांहींचा प्रवेश होतो, व रक्त कमकुवत असेल तर तेथें त्यांची वाढ होऊन त्या मनुष्याला हिवताप होतो. डांस आपल्या अन्नपाण्यावर बसला तर त्याबरोबरही त्याचा आपल्या शरीरांत प्रवेश होऊं शकतो. अर्थात् हिवताप होऊ न देण्याचे उपाय दोन: ( १ ) डांसांचे निर्मूलन करणें, (२) हिवताप झालेल्या माणसाला डांस न चावतील व त्याच्या संसर्गानें आपल्या अन्नपाण्यांत जंतु न शिरतील अशी खबरदारी घेणें. ( १ ) डांसांची उत्पत्ति सांचीव घाण पाण्यापासू