पान:आरोग्यविज्ञान.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ प्लेग. प्लेग उंदरांना प्रथम होतो. उंदीर प्लेगनें मेला ह्मणजे त्याच्या आंगावरील पिसवा त्याला सोडून दुसरीकडे रक्त खाण्याकरितां जातात, व उंदराच्या रक्तांतून त्यांच्याकडे आलेले प्लेगचे सूक्ष्मजंतु त्या ज्या ज्या प्राण्याला डसतील त्याच्या त्याच्या शरीरांत प्रवेश करितात, व त्यांना अनुकूल रक्त मिळालें ह्मणजे त्यांची बेसुमार वाढ होऊन प्राणी दगावतो. ह्यावरून प्लेग होऊं न देण्याचा पहिला उपाय ह्मटला ह्मणजे उंदीर होऊ न देणें हा होय. घरांत धान्य, भाकरीचे तुकडे वगैरे जमिनीवर पडूं दिले, सामान अस्ताव्यस्त राहूं दिलें, आवारांत उकिरडा सांचूं दिला ह्मणजे उंदीर, पिसवा, चिलटें व त्यांच्याबरोबरच नाना तऱ्हेचे रोग व जीवजंतु ह्यांना आमंत्रण दिल्यासारखेंच होतें. जिकडे तिकडे स्वच्छता ठेवून घरांत मुबलक उजेड व हवा येऊ दिली ह्मणजे या जीवांची उत्पत्तिच होत नाहीं व अर्थात् रोगप्रतिबंध होतो. दुसरा उपाय संसर्गानें प्लेग पसरू न देणें हा होय. ह्यासंबंधीं विवरण वर आलेच आहे. त्याशिवाय करावयाचें तें इतकेंच की प्लेगदूषित ठिकाणच्या लोकांना, एकदम दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्लेग पसरूं न देतां, कोठें तरी मोकळ्या जागेत ४।८ दिवस राहावयास लावणें. ह्या उपायाची सक्त अंमलबजावणी त्वरित केल्यामुळे हिंदुस्थान व सिलोन इतकीं जवळ असतां व त्यांचें मोठें दळणवळण असतां इतक्या वर्षांत सिलोनांत प्लेग जाऊं शकला नाहीं. इतके उपाय करूनही प्लेग झालाच तर स्थानत्याग करणें हा उत्तम मेल्यावर एक रात्रही तेथें राहू नये. १/२ उपाय. घरांत उंदीर महिने मोकळ्या