पान:आरोग्यविज्ञान.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ ठिकाणीं राहावें. घरी परत येण्यापूर्वी भिंतींना चुना वगैरे द्यावा, सगळीकडे खच्छता करावी, जमिनीवर निखारे पसरावे, म्हणजे पिसवा मरतील, व सर्व कपडे उन्हांत तापवून झाडून नंतर घरीं यावें. त्रास पुष्कळ झाला तरी स्थानत्याग करणें शक्य असेल तर अगदीं कसूर करूं नये. पण स्थानत्याग केल्यानें सर्व कार्य होतें असें नाहीं. कारण झोंपडींतून गांवांत खेपा कराव्याच लागतात. कांहींना तर, सर्व दिवस गांवांत उद्योगधंदा करावा, व केवळ रात्रीच्या विश्रांतीकरितां झोंपडींत जावें, असें करावें लागतें. अशा स्थितींत प्लेगजंतूंचा शरीरांत रिघाव झाला तरी त्यांचा नाश होईल अशी कांहीं युक्ति पाहिजे. अशी युक्ति प्लेग टोंचून घेणें ही होय. निरोगी व जोमदार शरीरांत रोगजंतूंचा नाश करण्याची जी शक्ति रक्तांत असते त्याच प्रकारची शक्ति प्लेग टोचल्याने रक्तांत उत्पन्न करितां येते. म्हणूनच टोंचलेल्या लोकांना प्लेग बहुधा होत नाहीं व झाला तरी रोगी सहसा दगावत नाहीं. ह्यासंबंधीं १९११ सालचे कांहीं आंकडे सरकारी प्रेसनोटमधून उतरून खाली दिले आहेत, त्यांवरून टोंचण्याच्या उपायाची उपयुक्तता नजरेस येईल. शहर. लोकसंख्या. लागले. मेले. विजापुर } ( टोंचलेले ३५९० २८ ८ न टोचलेले ६४१० १२२८ ८५७ टोंचलेले २७४२ २० गदग न टोचलेले ३ ३०२५८ १६९५ ११५० 7 टोंचलेले ९३ ३ सातारा ऽ न टोंचलेले ११७ २२