पान:आरोग्यविज्ञान.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९ तेव्हां प्लेगसंबंधीं ध्यानांत ठेवावयाचें म्हणजे (१) घरांत उंदरांना बिलकूल थारा न देणें, (२) संसर्गाविषयीं फार खबर - दारी घेणें, (३) गांवांत प्लेग झाल्यास स्थानत्याग करणें, व ( ४ ) प्लेग टोंचून घेणें हें होय. पटकी. ह्या रोगाचे सूक्ष्मजंतु अतित्वरित पसरतात. प्रसार बहुधा अन्न- पाण्यांतून होतो. एखाद्या ठिकाणीं जत्रेला हजारों लोक जमतात. ते पिण्याला व इतर व्यापारांना एकच ठिकाणचें पाणी वापरतात. आंघोळी, कपडे धुणें वगैरे सर्व एकाच नदीतळ्यांत झाल्यानें तें पाणी खराब होतें, तरी तेंच पिण्यांत येतें. ह्यांतच आणखी अपक्क, अतिपक्व फळांची भर पडते. मग काय विचारतां ? पटकी हां हां म्हणतां सुरू होते. पटकी झालेल्या माणसाच्या मलांत व वान्तींत त्या रोगाचे लाखों सूक्ष्मजंतु असतात. म्हणून मल व वान्ति लांब नेऊन जमिनींत पुरून टाकिली पाहिजे, व कपडे शक्य तर जाळून टाकिले पाहिजेत. तसें न करितां जर ते कपडे वर सांगितलेल्या नदीतळ्यांतच धुतले तर सर्व पाणी दूषित होऊन वाखा बेसुमार सुरू होतो. लागलीच जीव बचावण्याकरितां धांवपळ सुरू होते. या पळालेल्या लोकांपैकीं कांहीं प्रवासांतच आजारी पडतात, कांहीं मुक्कामास पोंचल्यावर पडतात, व ह्या लोकांचे कपडे धुतले गेल्यानें अगर इतर संसर्गानें ज्या ज्या ठिकाणीं त्या त्या ठिकाणी रोगाचें बी पेरलें पिण्याचे पाणी दूषित होतें जातें; व अशा रीतीनें हा वणवा जास्त जास्तच भडकत जातो.