पान:आरोग्यविज्ञान.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० सगळ्याचें मूळ शोधून पहाल तर कच्चीं अगर जास्त पिकलेली फळें, व पिण्याच्या पाणाच्या स्वच्छतेसंबंधीं वगैरे निष्काळजीपणा. संसर्गाची सर्वांत अति खबरदारी ज्यांत घेतली पाहिजे असा रोग म्हटला म्हणजे पटकी हा होय. तेव्हां रोग्याची शुश्रूषा केल्यावर हात पाय कॅर्बालिक साबणाने धुतल्याशिवाय अन्नपाणी घेऊ नये. कपडे, मल, वान्ति ह्यांसंबंधीं वर सांगितलेंच आहे. गांवचें पिण्याचें पाणी नदीपासून मिळत असेल तर नदीची वरची बाजू पिण्याकरितां राखून ठेवावी. तेथें स्नान, कपडे धुणें वगैरे अगदीं करूं देऊ नये. पाणी विहिरीचें पीत असतील तर पाणी काढून देण्याकरितां खच्छ घागरीसह एका मनुष्याची योजना करून वाटेल त्याची घागर विहिरींत बुडवूं देऊं नये. विहिरीभोंवतीं सांडलेलें पाणी आंत जाऊं नये म्हणून फरशी बांधावी. व सर्वांच्या कल्याणाकरितां, पटकी झालेल्या मनुष्याचा इतरांस संसर्ग न होईल ह्याविषयीं, शक्य ती काळजी घ्यावी. मनुष्याला पटकी झाल्याबरो- बर कढत दूध अगर कॉफी द्यावी, हात पाय शेकावे, आलें, सुंठ, हिंग, मिरीं, ब्रँडी वगैरे उष्ण पदार्थ पोटांत द्यावे, व मुख्य गोष्ट म्हणजे वेळ न गमावतां वैद्याला बोलावून आणावें. क्षय. अलीकडे मुंबईसारख्या मोठ्या णावर इतरत्रही क्षयरोगाचा बराच शहरांत व थोड्या कमी प्रमा- प्रसार झालेला दृष्टीस पडतो. क्षय हा फुप्फुसांचा रोग आहे. तो झाला म्हणजे फुप्फुसांचा वरचा भाग कुजूं लागून रोग्याला कफ पडूं लागतो; नेहमीं