पान:आरोग्यविज्ञान.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१ नेहमीं ताप येतो, अगर नेहमींच आंग जरा जास्त गरम असतें; कोणतेंही काम करण्याला उत्साह वाटत नाहीं; खाल्लेलें आंगीं लागत नाहीं; व हळुहळु क्षीण होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो. हाही रोग सूक्ष्मजंतूंपासूनच होतो. क्षयी मनुष्य थुंकतो तेव्हां त्याच्या कफांतून लाखों सूक्ष्मजंतु जमिनीवर पडतात, व थुंकी वाळून गेली कीं हवेबरोबर पसरून श्वासाबरोबर लोकांच्या शरी- रांत प्रवेश करितात, व शरीर कमकुवत असलें म्हणजे तेथें आपला पगडा बसवितात. कुवत ह्याचा अर्थ जोम, केवळ लठ्ठपणा नव्हे. आपल्या अंगांत जोम आहे कीं नाहीं हें ज्याचें त्याला उत्तम समजतें. असो. तेव्हां क्षयी माणसाच्या थुंकीमुळे व त्याच्या निकट नेहमीं राहिल्यामुळे क्षयरोग होण्याचा संभव असतो. एरव्ही सुद्धां जेथें तेथें थुंकण्याची जी कित्येकांना घाणेरडी संवय असते ती अगदीं अनिष्ट होय. क्षय निरनिराळ्या तऱ्हेच्या लोकांना झालेला आढळतो व त्याचीं कारणेंही निरनिराळी असतात. मुंबईसारख्या शहरांत सबंध दिवस गिरणीत काम करणारे व रात्रीं कोंदट घरांत अपुरत्या जागेत राहणारे पुष्कळ स्त्रीपुरुष असतात. संध्याकाळी हा घोळका गिरणीबाहेर पडल्यावर निरीक्षण केलें असतां प्रत्येक चेहन्यावर कापसाच्या कणांचें चांगलें पुट बसलेलें नजरेस पडतें. ह्या कणांपासून फुप्फुसांचा बचाव थोडाबहुत करण्याकरितां नाकांत केंसरूपी फिल्टर असतें, पण त्यानें कांहीं सर्व काम होऊं शकत नाहीं. हळुहळु फुप्फुसांत कणांचा प्रवेश होतो व रक्तशुद्धीच्या त्यांच्या कामाला व्यत्यय येतो, अर्थात् शरीर कम-