पान:आरोग्यविज्ञान.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ कुवत होऊं लागतें. त्यांतच व्यसनांची भर पडते, व अशा रीतीनें भक्कम बांध्याचा तरुणही दोन चार वर्षीत खचतो, कदाचित् मृत्युमुखींहि पडतो. अलीकडे विद्यार्थ्यात ह्या रोगाचें थोडें वाढतें प्रमाण आहे. त्याचे एक कारण हैं कीं शरीराची वाढ होण्याचें जें वय त्या वयांत त्या गोष्टीकडे ते कानाडोळा करितात; ह्यामुळे प्रकृतींत जोम मुळींच नसतो, सरासरी तोळामासा प्रकृति असते. दुसरें कारण नाटकें, कादंबऱ्या, बाष्कळ गप्पा वगैरेंनीं झालेली मानसिक चलबिचल व तीमुळे लागलेल्या घाणेरड्या संवयी. हें सर्व शिकलेल्या मुलांना जितकें तितकेंच शिकलेल्या मुलींनाही लागू पडतें. ह्याला उपाय हाच कीं विद्यार्थिदशेत शरीर बांधेसूद व निरोगी व्हावें ह्याकरितां झटून प्रयत्न करणें, व तितकीच किंबहुना त्याहूनही ज्यास्त महत्त्वाची गोष्ट झटली ह्मणजे, मन सुविचारी व निग्रही होण्याकरितां रोज चांगल्या पुस्तकांचें वाचन व त्यांतील सुविचारांवर मनन करणें, मनाला नेहमीं उद्योगांत ठेवणें, व यच्चयावत् वाईट गोष्टी विषवत् बाजूला सारणें. मुंबईसारख्या शहरांत तरुण स्त्रियांना हा रोग झालेला आंढ- ळतो, व त्याचें कारण अकाली आंगावर पडलेलें संसाराचें ओझें होय. ह्याला उपाय म्हणजे शरीराची वाढ पूर्ण होईपर्यंत विवाह न करणें, तोंपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे शरीराची व मनाची काळजी घेणें, व शरीराची वाढ पूर्ण झाल्यावर फार दिवस अविवाहित न राहणें हेच होत.