पान:आरोग्यविज्ञान.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ भाग ६० 4:00 तात्कालिक उपाय. तात्कालिक उपाय म्हणजे एखाद्या मनुष्याला कांहीं अपघात घडला किंवा प्रकृतीस एकदम कांहीं विकार झाला तर डॉक्टर वगैरे येईपर्यंत करावयाचे उपाय. अशा वेळीं आजार अगर दुखापत जरा विशेष प्रकारची वाटली तर डॉक्टरला बोलावणें लगेच पाठवावें व तो येईपर्यंत खाली दिलेल्या सूचनांप्रमाणें उपाय करावे. व्यवहारांत तात्कालिक उपायांचा विशेष उपयोग रक्तस्राव ज्यांत फार होतो अशा विकारांच्या अगर अपघातांच्या वेळीं होतो. अशा वेळीं चटकन् योग्य उपाय करून रक्तस्राव बंद करणें फार अगत्याचें असतें. तसें न केलें तर कधीं कधीं मनुष्य दगावण्याचाही संभव असतो. रक्तस्राव. तात्कालिक उपायांचा उद्देश बहुधा रक्तस्राव फार होत असेल तर बंद करणे हाच असतो. पण जखमेंत विष भिनलें असेल तर रक्तस्राव थोडा होऊं देणेंच इष्ट असतें. रक्तस्राव दोन प्रकारचा असतो: ( १ ) शुद्धरक्तवाहिन्यांतून झालेला, (२) अशुद्ध रक्तवाहिन्यांतून झालेला. अशुद्ध रक्तवाहिन्या त्वचेच्या लगतच आंतल्या बाजूस असतात. किडकिडीत लोकांच्या