पान:आरोग्यविज्ञान.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ हातापायांच्या ज्या फुगलेल्या शिरा दिसतात असे आपण म्हणतों त्या अशुद्धरक्तवाहिन्या. शरीर असावें तसें पुष्ट असलें म्हणजे त्या फार दिसत नाहींत. ह्यांतून स्रवणारें रक्त काळसर तांबडें असतें च तें सावकाश संथपणें वहातें. शुद्धरक्तवाहिन्यांचे पुन्हा दोन भेद असतातः ( १ ) काळजाकडून रक्त घेऊन येणारी मुख्य धमनी अगर ( २ ) तिच्या केंसासारख्या बारीक शाखा. ह्यांतून येणारें रक्त लाल असतें. मुख्य धमनी जरा आंतल्या बाजूस असते. तीही कापली गेल्यास तींतून काळजाच्या प्रत्येक ठोक्यासरशी तुड्, तुङ्, तुड्, पिचकारीसारखें रक्त बाहेर पडतें. अशी जखम होणें फार वाईट व काळजी करण्यासारखें असल्यामुळे उपाय अति त्वरित झाला पाहिजे. →-- रक्तस्राव बंद करण्याचे उपाय. ( १ ) जखमी मनुप्याला निजवून जखम अवयवास झाली असेल तर तो अवयव वर उचलून धरावा. (२) जखम बोटानें दाबून धरावी व तेवढ्यांत कपड्याच्या दोन चार घड्या करून नंतर तो जखमेवर दाबून धरावा. त्याच्यावरून पट्टी बांधून टाकावी व जखमेवरची घडी बाजूला सरूं नये म्हणून पट्टींत मध्यें बुचाची चकती अगर नाणें घालावें. (३) अशा तऱ्हेनें पट्टी बांधली तरीही रक्तस्राव चालूच राहील तर ज्या बाजूनें रक्त येत असेल त्या बाजूकडे अगदीं घट्ट वेष्टण चांधावें; उदाहरणार्थ, शुद्धरक्तवाहिनींतून रक्तस्राव होत असेल