पान:आरोग्यविज्ञान.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ तर जखम व काळीज यांच्या दरम्यान योग्य ठिकाणीं वेष्टण बांधलें पाहिजे. तात्पुरतें वेष्टण हातरुमालाला घड्या पाडून मध्येच दोन घड्यांत लांकडाची धलपी, बूच अगर एखादा गुळ- गुळीत दगड देखील घालून करितां येतें. रक्तवाहिनीशिरेवर ही धलपी वगैरे बरोबर बसेल असें करून वेष्टण घट्ट आंवळावें. नीट आंवळतां यावें म्हणून पाहिजे तर वेष्टणाचा एक फेरा दुखावलेल्या भागाभों- वतीं देऊन गांठ मारावी व गांठींत एखादी काटकी घालून गांठ पिळावी. औषध वगैरेची योजना लवकर न झाली तर हें वेष्टण हळू हळू सैल सोडावें व रक्त पुन्हां वाहूं न लागेल इतकेंच घट्ट ठेवावें. ( ४ ) जखमेला थंड पाणी अगर बर्फ लावावें. ह्याने बरेच वेळां रक्त येण्याचें बंद होतें. (५) जखमेवर तुरटीची पूड टाकून रक्त गोठण्यास मदत करणें हाही एक उपाय आहे. नाकांतून रक्त पडूं लागलें असता डोके उचलून धरावें व दोन्ही हात वर करून डोक्याच्या मागल्या बाजूस फेंकावे. भिवयांच्या मधला भाग व मानेचा मागचा भाग, थंड पाण्यांत बुडवून पिळलेल्या फडक्यानें अगर बर्फानें गार करावा. थुंकींतून, कफांतून रक्त पडूं लागलें किंवा रक्ताच्या गुळण्या होऊं लागल्या तर त्या मनुष्याला निजवावें व डोकें जरा वर उचलून धरावें. रबराच्या पिशवीत बर्फ अगर थंड पाणी भरून